किनगाव जट्टू येथील श्रीरामनवमी उत्सव स्थगित वार्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:31 AM2021-04-19T04:31:34+5:302021-04-19T04:31:34+5:30
कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. येथील श्रीरामनवमी उत्सवाकरिता पंचक्रोशीतील भाविक ...
कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने शासनाच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. येथील श्रीरामनवमी उत्सवाकरिता पंचक्रोशीतील भाविक येतात. व्यवसाय, नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले नागरिक या उत्सवाकरिता गावी येऊन सहभागी हाेतात.० मात्र, गतवर्षीपासून कोरोनाचा प्रभाव कमी झाला नसल्याने यावर्षीसुद्धा उत्सवाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. श्रीरामनवमी उत्सव कार्यक्रम रद्द करण्याची ही तीनशे पन्नास वर्षांतील दुसरी वेळ आहे. कोरोनाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने बाजारपेठ शाळा, कॉलेज, सार्वजनिक धार्मिक कार्यक्रम बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. येथील श्रीराम मंदिरात गुढीपाडव्याला गुढी उभारून पाडवा ते नवमी यादरम्यान अध्यात्मरामायण उपासना, अभिषेक, भजनपूजन, नऊ दिवस अन्नदान ,नवमीला दुपारी बारा वाजता श्रीरामाचा जन्मोत्सव सजरा करण्यात येताे. मात्र यावर्षीसुद्धा उत्सव स्थगित ठेवण्यात आल्याचे समितीच्या वतीने रंगनाथ बिनीवाले यांनी कळविले आहे.