श्रीरामच्या जयघोषाने बुलडाणा दुमदुमले!
By admin | Published: April 16, 2016 01:52 AM2016-04-16T01:52:17+5:302016-04-16T01:52:17+5:30
बुलडाणा येथे शोभायात्रेतील देखावे ठरले आकर्षण.
बुलडाणा : 'सियावर रामचंद्र की जय'चा जयघोष, टाळ मृदंगाचा गजर, ढोल पथकांचा निनाद आणि तरुणाईच्या जल्लोषात श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्यावतीने शुक्रवारी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. विष्णुवाडीतील गजानन महाराज मंदिर परिसरातून संध्याकाळी ५ वाजता या शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. शोभायात्रेत अग्रभागी रथावर राम, लक्ष्मण व सी ता तसेच संत श्री गजानन महाराज यांची आकर्षक मूर्ती होती. भाग्योदय महिला ढोल-ताशा पथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. यासोबतच भाग्योदय, पेशवाई, जयभवानी, मोरया ढोल ताशा पथक शोभायात्नेत सामील झाले होते. याशिवाय शहरातील विविध भजनी मंडळांचा यामध्ये सहभाग हो ता. या शोभायात्रेत ११ फूट उंच श्रीरामाची मूर्ती शोभायात्नेचे मुख्य आकर्षण होते. शोभायात्रा संगम चौक, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, जनता चौक मार्गे पेठेतील श्रीराम मंदिरात पोहोचली. यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. शोभायात्रेत आमदार हर्षवर्धन सपकाळ, ना. रविकांत तुपकर, माजी आमदार धृपदराव सावळे, माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे पाटील, जालींधर बुधवत, दत्ता काकस, विश्वनाथ माळी, देवेंद्र खोत, विजया राठी, जगदेवराव बाहेकर, हर्षल जोशी, सोनू बाहेकर, किरण देश पांडे, उत्कर्ष ढापणे, सचिन देशलहरा, अरविंद होंडे, नितीन श्रीवास, सचिन टेभींकर, पवन बेंडवाल, श्रीराम देशमुख, अँड. जयंत जोशी, प्रशांत देशपांडे, मदन बेराड, सुयोग अन्वेकर, प्रकाश देशलहरा, मंगेश बिडवे, विजया राठी, वैशाली डाबेराव, अलका पाठक आदींची उपस्थि ती होती. यावेळी वीर सावरकर चौक मित्रमंडळातर्फे सरबत वाटप करण्यात आले.