दिरंगाईच्या चौकशीसह दोषींवर कारवाईचे संकेत
By admin | Published: April 24, 2015 01:36 AM2015-04-24T01:36:56+5:302015-04-24T01:36:56+5:30
खामगाव पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी सवरेतोपरी प्रयत्न.
खामगाव (जि. बुलडाणा): शहर आणि परिसरातील नागरिकांसाठी संजीवणी ठरणार्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचा नगर विकास राज्यमंत्री ना. डॉ.रणजित पाटील यांनी गुरूवारी आढावा घेतला. योजनेस लागत असलेल्या विलंबाची चौकशी करून यासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ना. रणजित पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. शहरातील वाढीव पाणीपुरवठा योजना रखडल्याप्रकरणी भाजप नेते आ.भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुढाकारात वाढीव पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न शासनदरबारी पोहोचविण्यात आला. त्यानंतर नगरविकास राज्यमंत्री ना.डॉ.रणजित पाटील यांनी या प्रकाराची दखल घेत, २३ एप्रिल रोजी त्यांच्या दालनात बैठक बोलाविली. यावेळी आ. भाऊसाहेब फुंडकर, आ. गोपीकिसन बाजोरिया, आ.आकाश फुंडकर, माजी नगराध्यक्ष गणेश माने, नगरसेवक संजय पुरवार, संदीप वर्मा, शेखर पुरोहित, स तीशआप्पा दुडे यांची उपस्थिती होती.