'सामाजिक न्याय’चे वसतिगृह प्रवेश रखडण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 11:42 AM2021-06-22T11:42:02+5:302021-06-22T11:42:14+5:30
Education Sector News : शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाल्यावरच वसतिगृहांत प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : राज्य सरकारने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने यावर्षी सामाजिक न्याय विभागामार्फत चालणाºया मागासवर्गीय वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सलग दुसºया वर्षीही रखडण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाल्यावरच वसतिगृहांत प्रवेश दिला जाईल, अशी माहिती मिळत आहे.
जिल्ह्यात सामाजिक व न्याय विभागामार्फत चालणारे मुला-मुलींची वसतिगृहे आहेत. जिल्ह्याच्या कानाकोपºयातून येणाºया विद्यार्थ्यांची सोय शासकीय वसतिगृहात केली जाते. जून महिन्यामध्ये शाळा, महाविद्यालये सुरू होत असल्याने वसतिगृहांचीही प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाते. वसतिगृहात अनुसूचित जाती जमाती, विजभज, आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग, अनाथ व दिव्यांग प्रवगार्तील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांकडून वसतिगृहातच आॅफलाइन अर्ज स्वीकारले जातात. अर्ज स्वीकारल्यानंतर गुणवत्तेप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली जाते, तसेच शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांना विभागाच्या वतीने रोख रक्कम दिली जाते. यामुळे या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी गर्दी करतात.
मात्र, यावर्षी देशासह राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्याच्या शिक्षण विभागाने संसगार्चा धोका लक्षात घेऊन राज्यातील शाळा, महाविद्यालये तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालये सुरू झाली, तरच या वसतिगृहांत नवीन वर्षात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होते. मात्र, शिक्षण विभागाकडून शाळा, महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात ठोस निर्णय होत नसल्याने जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील नवीन प्रवेश प्रक्रिया रखडल्याचे चित्र दिसून येत आहे.
...अशी असते प्रकिया
वसतिगृहात सातवी उत्तीर्ण झाल्यावर आठवीच्या मुला-मुलींना प्रवेश दिला जातो. या विद्यार्थ्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी वसतिगृहात राहण्याची व्यवस्था असते. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नव्याने प्रवेशासाठी अर्ज करावा लागतो. गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांची निवड होते. हे विद्यार्थी बारावीपर्यंत वसतिगृहात राहतात. बारावी पास झाल्यानंतर पदवीच्या शिक्षणासाठी अनुसूचित जाती, जमाती प्रवगार्तील विद्यार्थी वसतिगृहात राहण्यासाठी अर्ज करू शकतात.
या विद्यार्थ्यांची निवड ही मिळालेल्या गुणांच्या आधारे होते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजभज, आर्थिकदृष्ट्या मागासप्रवर्ग, अनाथ व दिव्यांग विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात. यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड जोडावे लागते. हे अर्ज केलेल्या यादीमधून प्रचलित नियमाप्रमाणे मागासवर्गीय प्रवर्ग आणि रिक्त जागा खास बाब यांच्या अधीन राहून गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतात.