औषध विक्रेत्यांचा शहरात मूक मोर्चा

By admin | Published: May 31, 2017 12:39 AM2017-05-31T00:39:38+5:302017-05-31T00:39:38+5:30

बुलडाणा: केंद्र सरकारच्या ई-पोर्टल या योजनेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने ३० मे रोजी संप पुकारला.

Silent Front in the City of Drug Stores | औषध विक्रेत्यांचा शहरात मूक मोर्चा

औषध विक्रेत्यांचा शहरात मूक मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: केंद्र सरकारच्या ई-पोर्टल या योजनेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने ३० मे रोजी संप पुकारला.या संपाला प्रतिसाद देत बुलडाणा जिल्ह्या औषध विके्रता संघटनेकडून आज सकाळी १० वाजता स्थानिक प्रशासनकीय इमारतीमधून मुकमोर्चा काढला. यावेळी आपल्या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच अन्न व औषध प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.
औषधविके्रत्यांच्या संपात जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील जवळपास १२५० औषधविके्रता सहभागी झाले होते. मात्र संपादरम्यान नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आपातकाळीत स्थितीत संघटनेकडून काही दुकानांवर औषधविक्री सुरु ठेवण्यात आली होती. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नाहारा, जिल्हा सचिव गजानन शिंदे, सहसचिव विजय एंडोल यांच्या नेतृत्वात शहरात मुकमोर्चा काढण्यात आला. यात शहरातील २०० औषधविके्रता व संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने आॅनलाइन फार्मसीला विरोध केला आहे. यामध्ये डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे दिली जात असून झोपेच्या गोळ्या किंवा तत्सम धोकादायक औषधांची विक्री केली जाते अशी तक्रारी संघटनेकडून करण्यात आली होती. यावर उपाययोजना म्हणून केंद्र सरकारने देशातील सर्वच औषध विक्रेत्यांसाठी ई-पोर्टल सुरू करण्याचे जाहीर केले. मात्र याला अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने विरोध दर्शविला आणि याविरोधात संपाचे पाऊल उचलले असल्याचे निवेदनात नमुद आहे.
--

Web Title: Silent Front in the City of Drug Stores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.