रोहिंग्या मुस्लिमांवरील अन्याय दूर करण्यासाठी मूक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 11:59 PM2017-09-15T23:59:27+5:302017-09-15T23:59:47+5:30
बुलडाणा: आपल्या शेजारी देश म्यानमार (बर्मा) येथील रोहिंग्या मुस्लमान व इतर धर्मीयांवर अत्याचार व नरसंहार सुरू असून, संपूर्ण जग हा अन्याय उघड्या डोळ्याने बघत आहे. हा अमानवीय अन्याय थांबवण्यासाठी भारत सरकारने म्यानमार सरकारावर दबाव आणून देश सोडून आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांना भारतात राहण्यासाठी योग्य मदत करावी, या मागणीसाठी शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी बुलडाणा शहरात ‘जमीअत उलमा-ए-हिन्द’च्या वतीने व जिल्हय़ातील लोणार व मेहकर शहरात मूक मोर्चे काढण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा जिल्हा जमीअत उलमाच्या नेतृत्वात येथील इकबाल चौकातून दुपारी ३ वाजता मूक मोर्चास सुरूवात झाली. सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यानं तर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, कोणताही धर्म हिंसेचे शिक्षण देत नाही. आज म्यानमार या देशात राहणार्या रोहिंग्या मुस्लीम व इतर धर्मीय अल्पसंख्याक समाजाचे लहान मुले, महिला व युवकांची निर्घृणपणे हत्या करण्यात येत असून, त्यांना जिवंत जाळण्यात येत आहे. त्यामुळे सदर कुटुंबीय कंटाळून आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडून शेजारील देशात प्रवेश करी त आहेत. या अन्यायग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी भारत शासनाने देशात येण्यासाठी सहकार्य करावे जेणे करून शोषित-पीडित रोहिंग्या मुसलमान व इतर लोकांना आपला जीव वाचवून शांततेत राहता येईल. तसेच भारत सरकारने आपली नैतिक जबाबदारी समजून आंतरराष्ट्रीय स्तरावर इ तर देशांना सोबत घेऊन म्यानमार सरकारवर दबाव आणावा. तसेच रोहिंग्या मुसलमानवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही नमूद केले आहे. यावेळी जिल्हा जमीअत उलमाचे सर्व पदाधिकारी व जिल्हय़ातून आलेले मौलाना, सामाजिक नेते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
मेहकर येथील स्वांतत्र्य मैदानावर जाहीर सभा
मेहकर: म्यानमार बर्मामध्ये मुस्लीम समाजबांधवांवर अ त्याचार होत असल्याच्या निषेधार्थ १५ सप्टेंबरला हजारो मुस्लीम महिलांनी अभूतपूर्व ऐतिहासिक मूक मोर्चा काढला. त्यानंतर स्वातंत्र्य मैदानावर जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी मोर्चातील महिलांना जनसमुदायाला मार्गदर्शन केले.
लोणार तहसीलवर मूक मोर्चा
लोणार : म्यानमार देशातील रोहिंग्या मुस्लीम नागरिकांवर होणारे अन्याय थांबवावेत, या मागणीसाठी शहर व तालुक्या तील हजारो मुस्लीम बांधवांनी तहसील कार्यालयावर १५ स प्टेंबर रोजी मूक मोर्चा काढला. यावेळी तहसीलदार सुरेश कव्हळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शहरातील जामा मशीद चौकापासून दुपारी २.३0 वाजता मूक मोर्चाला सुरुवात झाली. मूक मोर्चामध्ये सहभागी नागरिकांच्या हातात रोहिंग्या मुसलमान पर अत्याचार बंद करो’ या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते.