१४४८ शाळांमध्ये सरल शैक्षणिक प्रणाली
By Admin | Published: November 18, 2016 02:35 AM2016-11-18T02:35:55+5:302016-11-18T02:35:55+5:30
आता गुरुजींना लावावी लागणार वेळेत हजेरी
नवीन मोदे
धामणगाव बढे, दि. १७- शालार्थ, सरल शैक्षणिक संगणकीय प्रणाली उपक्रमाची अंमलबजावणी जि.प. शाळातील मुख्याध्यापकांच्या माध्यमातून जिल्हय़ातील एकूण १,४४८ शाळामधून १५ नोव्हेंबरपासून झाली आहे.
राज्य शासनाच्यावतीने ई-गव्हर्नन्स धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली असून त्या अनुषंगाने शालार्थ, सरल इ. विविध शैक्षणिक संगणकीय प्रणालींचा वापर करण्यात आला. तथापी शिक्षक व विद्यार्थ्यांंंचे सनियंत्रण करण्यासाठी अद्यापपर्यंंंत कुठलीही केंद्रीकृत सनियंत्रण प्रणाली कार्यान्वित नव्हती. त्या अनुषंगाने शिक्षक व विद्यार्थ्यांंंंच्या उपस्थितीचे सनियंत्रण करण्यासाठी सिस्टीम टिचर्स ऑनलाइन रिपोर्टींंंग अँड मानीटरींग या अँड्राईड फोन व्हॉटस्अँप बेस प्रणालीचा बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत पथदश्री स्वरुपात (पायलेट बेस) प्रायोगिक पातळीवर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमाची जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकाची आहे. त्यांच्याकडील फोनमध्ये एका अँपच्या माध्यमातून शाळा प्रारंभ होताच शिक्षकांच्या सही करतानाचा फोटो घेऊन तो वरिष्ठांना पाठवायचा असतो. संबंधीत शिक्षक ज्या वेळी सही करतील ती वेळ सुध्दा नोंदविली जाते. यामुळे शिक्षकांना आता वेळेत हजर होने बंधनकारक होणार आहे.
या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदारी संबंधीत गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सोपविण्यात आली आहे. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिपा मुधोळ यांनी याबाबतचे निर्देश संबंधीतांनी दिले. त्यामुळे जिल्हाभरातील जि.प.शाळातील विद्यार्थ्यांंंंची हजेरी घेणार्या ह्यगुरुजींनाह्ण वेळेत हजेरी लावावी लागणार आहे.
शासनाच्या या निर्णयाला जिल्हा परिषद शिक्षकांनी व्यापक पातळीवर विरोधही केला आहे. मात्र, शासनाने शिक्षकांच्या विरोधाला न जुमानता सदर उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.