कृषी संजीवनी योजनेला अत्यल्प प्रतिसाद
By Admin | Published: November 13, 2014 11:59 PM2014-11-13T23:59:47+5:302014-11-14T00:17:28+5:30
खामगाव तालुक्यातील ४२ हजार पात्र, मात्र केवळ १४८३ शेतक-यांनीच घेतला लाभ.
खामगाव (बुलडाणा): कृषी वीज पंपाची असलेली मोठय़ा प्रमाणात थकबाकी व निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्यांची असलेली बिकट आर्थिक परिस्थिती पाह ता वीज वितरण कंपनीने शेतकर्यांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली हो ती. मात्र ३१ ऑक्टोबर या मुदतअखेर सदर योजनेचा लाभ घेणार्या शेतकर्यांची आकडेवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. वीज वितरण कंपनीच्या खामगाव उपविभागात ५२ हजाराचे आसपास कृषी जोडणी असून यापैकी तब्बल ४२ हजार ५१२ कृषीपंपधारकांकडे वीज थकबाकी झाली आहे. मात्र या योजने अं तर्गत ३१ ऑक्टोबर या योजनेच्या अखेरपर्यंंत ४२ हजार ५१२ पात्र शेतकर्यांपैकी फक्त १४८३ शेतकर्यांनी थकबाकीचा भरणा केला. एकूण थकबाकी ७३३९.२३ लाख असताना भरणा फक्त ५७.३६ लाखाचाच झाला आहे. त्यामुळे झालेली वसुली नाहीसारखीच आहे. गतवर्षी सुध्दा परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकर्यांचे अतोना त नुकसान झाले होते. त्यामुळे कोठे दुष्काळ तर कोठे दुष्काळसदृश परिस्थिती शासनाकडून सर्वेक्षणानंतर जाहीर करण्यात आली. दुष्काळाच्या निकषानुसार शेतकर्यांना इतर योजनांसोबतच थकीत कृषी बिल भरता यावे, कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत शे तकर्यांना थकीत रक्कमेवरील व्याजमाफी तसेच बिलातही काही टक्के सूट देण्यात आली. तसेच थकबाकी भरण्यासाठी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान तीन हप्तेवारीत पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र यावर्षी उशीरा झालेला पाऊस त्यामुळे लवकर येणारी उडिद, मूग, तीळ ही पिके शेतकर्यांना घेता आली नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. परंतु ऐन सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिक असताना पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे शेंगा परिपक्व होण्याआधीच सोयाबीन वाळल्याने शेतकर्यांचा पेरणीचा खर्च सुध्दा निघाला नाही. अशी परिस्थिती असताना शेतकरी कृषी संजीवनी ही चांगली योजना असताना सुध्दा फायदा घेवू शकले नाही. देयक भरण्याबाबत अनास्था होती. त्यामुळे कृषी संजीवनी योजनेचा शेतकर्यांना लाभ मिळू शकला नाही.