सिंदखेडराजा : जिजाऊ जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मशाल यात्रा ठरली आकर्षण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:41 AM2018-01-12T01:41:58+5:302018-01-12T01:42:16+5:30
बुलडाणा : राजमाता माँ जिजाऊंच्या ४२0 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजातील राजवाड्यावर आकर्षक रोषणाई करण्यात येऊन मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मशाल यात्रा काढण्यात आली. परिसरातील महिला वर्ग सायंकाळी मोठय़ा प्रमाणावर राजवाड्यासमोर जमून तेथे दीप प्रज्वलित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राजमाता माँ जिजाऊंच्या ४२0 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजातील राजवाड्यावर आकर्षक रोषणाई करण्यात येऊन मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला मशाल यात्रा काढण्यात आली. परिसरातील महिला वर्ग सायंकाळी मोठय़ा प्रमाणावर राजवाड्यासमोर जमून तेथे दीप प्रज्वलित करण्यात आले.
यावेळी जिजाऊ मासाहेबांचा जयघोष करीत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. रेखा चव्हाण, कार्याध्यक्ष माधुरी भदाने, प्रदेश महासचिव पूनम पारसकर, प्रदेश कोषाध्यक्ष वनिता अरबट, जिल्हाध्यक्ष वनिता गायकवाड, तालुका अध्यक्ष ज्योती जाधव, जन्मोत्सव सचिव सुभाष कोल्हे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अँड. राजेंद्र ठोसरे, शारदा बावणे, डॉ. प्रिया हराळे, सीमा भालेराव, सरिता म्हस्के, अँड. उर्मिला हाडेंसह अन्य महिला यात सहभागी झाल्या होत्या. राजवाड्याला प्रदक्षिणा घालून राजवाड्यासमोर यात्रेचा समारोप झाला.
या मान्यवरांची राहणार उपस्थिती
छत्रपती तथा सातार्याचे खासदार उदयनराजे भोसले, छत्रपती बाबाजीराजे भोसले, कोल्हापूरचे खासदार छत्रपती युवराज संभाजीराजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, नाना पटोले यांच्यासह मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष इंजिनिअर विजय घोगरे, महासचिव इंजिनिअर मधुकर मेहकरे उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अँड. पुरुषोत्तम खेडेकर यांचे समारोपीय भाषण होईल.
सूर्याेदयी महापूजा
मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्यांच्या हस्तेही सूर्याेदयी जिजाऊ जन्मस्थळी महापूजा करण्यात येणार आहे. ३२ कक्षांमधील प्रमुख जोडप्यांच्या हस्ते ही पूजा होणार आहे. त्यानंतर वारकरी दिंडी निघेल. त्यानंतर जिजाऊ सृष्टीवर ध्वजारोहण होणार आहे.
नगराध्यक्षांच्या हस्ते पूजा
सिंदखेडराजा नगराच्यावतीने नगराध्यक्ष अँड. नाझेर काझी, उपाध्यक्ष सीमा शेवाळे यांच्या हस्ते नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी जिजाऊ मासाहेबांची जन्मस्थळी पूजा होईल. त्यानंतर खा. सुप्रिया सुळे, छत्रपती आ. शिवेंद्र राजेंच्या उपस्थितीत कार्यक्रम होईल.