सिंदखेड राजा : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त निघाली शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:25 AM2018-01-04T00:25:03+5:302018-01-04T00:25:56+5:30
सिंदखेड राजा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मस्थान असणार्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे नगर परिषदेतर्फे ३ जानेवारी रोजी पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
काशिनाथ मेहेत्रे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जन्मस्थान असणार्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे नगर परिषदेतर्फे ३ जानेवारी रोजी पूजन व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी होणारा हा भव्य सोहळा राज्यातील सर्वात मोठा सावित्रीबाई फुले जयंती उत्सव सोहळा असल्याचे मत अनेकांनी आपल्या विचारातून व्यक्त केले.
राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचे जन्मस्थळ असणारे सिंदखेडराजा हे जागतिक स्त्रीशक्तीचे केंद्र असून, हीच स्त्रीशक्तीची प्रेरणा येणार्या पिढय़ांना मिळत असल्यानेच ज्ञानज्योती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाचे व शोभायात्रेचे आयोजन दरवर्षीप्रमाणे नगर परिषदेच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ जन्मस्थळाबाहेर उभारलेल्या शामियाना इथे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रांतिज्योत प्रज्वलीत करून करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष नाझेर काझी, उपाध्यक्ष सीमा शेवाळे, बालकल्याण सभापती द्रोपदीबाई ठाकरे, नगरसेविका डॉ.सविता बुरकुल, जयo्री जाधव, सीताराम चौधरी, दिलीप आढाव, सरस्वती मेहेत्रे, नंदा मेहेत्रे, छबाबाई जाधव व मुख्याधिकारी धनo्री शिंदे, नगरसेविका व माजी नगराध्यक्ष गंगा तायडे, देवीदास ठाकरे यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व पूजन करण्यात आले.
भव्य अश्वारूढ रथावर सावित्रीबाई फुले व जिजाऊ मासाहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करून नगरातील मुख्य मार्गाने शोभायात्रा काढण्यात आली. बॅण्ड व ढोल पथकाबरोबर गावातील नारायण महाराज मेहेत्रे, म्हातारबा झोरे यांच्या नेतृत्वात वारकरी अभंग पथकातील मंगलवाद्य व जयघोषाचा नाद केला. या शोभायात्रेत हजारो स्त्री-पुरुषांसह नगरातील सर्व कॉलेज, विद्यालयाचे विद्यार्थी व सावित्रीबाईंची वेशभूषा केलेल्या शेकडो विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी जगन ठाकरे, शिवसेना तालुकाप्रमुख शिवप्रसाद ठाकरे, राजे शिवाजी जाधव, छगन मेहेत्रे, विष्णू मेहेत्रे, गफ्फार मेंबर, फकीरा जाधव, तुळशीदास चौधरी, सखाराम आढाव, शंकर केळकर, राजेंद्र अंभोरे, अतिष तायडे, विनोद ठाकरे, संजय मेहेत्रेंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नेहा बोंद्रे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. तर नगराध्यक्ष नाझेर काझी यांनी सावित्रीबाईंनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी करण्याचे आवाहन केले. संचालन संदीप मेहेत्रे यांनी केले. यासाठी सर्व विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, न.प.कर्मचारी, युवा सावता ग्रुप यांनी परिo्रम घेतले.
कन्येला जन्म देणार्या मातेचा साडी-चोळी देऊन सत्कार
सावित्रीबाई फुले यांच्या आजच्या जयंतीपासून सिंदखेड राजा नगरीत कन्येला जन्म देणार्या प्रत्येक मातेचा सन्मान साडी-चोळी देऊन करण्याचा निर्धार यावेळी माजी नगराध्यक्ष नंदा मेहेत्रे व विष्णू मेहेत्रे यांनी केला.