निराधारांना दिली मायेची उब; सिंदखेड राजाच्या माजी न.प. अध्यक्षांकडून चादरीचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 02:39 PM2017-12-01T14:39:43+5:302017-12-01T14:40:39+5:30
सिंदखेडराजा : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे स्मृतीदिनानिमित्त सिंदखेडराजा नगर परिषदेच्या सदस्या तथा माजी नगरअध्यक्षा नंदाताई मेहेत्रे व त्यांचे पती शिवसेनेचे विष्णू मेहेत्रे यांनी पालावरील गरजू लोकांना चादरीचे वाटप करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
सिंदखेडराजा : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांचे स्मृतीदिनानिमित्त सिंदखेडराजा नगर परिषदेच्या सदस्या तथा माजी नगरअध्यक्षा नंदाताई मेहेत्रे व त्यांचे पती शिवसेनेचे विष्णू मेहेत्रे यांनी पालावरील गरजू लोकांना चादरीचे वाटप करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. दिपावली सणाला सुद्धा या दाम्पत्यांनी पारधी पाड्यावर जाऊन पारधी समाज बांधवांना १०१ साड्यांचे व फराळाचे वाटप केले होते. त्याच प्रकारे महात्मा ज्योतीबा फुले यांचे स्मृती दिनानिमित्त नंदाताई मेहेत्रे, विष्णू मेहेत्रे या दाम्पत्यांनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेला अभिवादन करुन त्यानंतर टी पॉर्इंटजवळील प्रांगणात तात्पुरते वास्तव्यास असलेल्या पालावरील मजुर कुटूंबाला ७५ चादरीचे वाटप केले व स्मृतीदिन साजरा केला. यावेळी राजेंद्र अंभोरे, कैलास मेहेत्रे, फकीरा जाधव, खंडू ठाकरे, अर्जुन काकडे, अशोक मेहेत्रे, मधुकर ठाकरे, शाम मेहेत्रे, योगेश तिडके, अमर जाधव, डॉ.डिगांबर मेहेत्रे, डॉ.यशवंता झोरे, अमोल देहाडे, अशोक जाधव, रामदास मेहेत्रे, अनिल मेहेत्रे सह नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)