मेहकरात सिंधुताई जाधव कोविड केअर सेंटर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:28 AM2021-05-03T04:28:56+5:302021-05-03T04:28:56+5:30
रविवारी खासदार प्रतापराव जाधव यांनी १०० बेडच्या सर्व सुविधांनी युक्त अशा या कोविड सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ...
रविवारी खासदार प्रतापराव जाधव यांनी १०० बेडच्या सर्व सुविधांनी युक्त अशा या कोविड सेंटरचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना खासदार जाधव पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी प्रत्येक विभागात कोविड केअर सेंटर सुरू करून रुग्णांना सेवा व हिंमत द्यावी. मेहकरमधील या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना सर्व सुविधा, वायफाय, योगा शिकविला जाणार आहे. जेवणाची व काढ्याची सोय केली जाणार आहे. आमदार संजय रायमुलकर यावेळी म्हणाले की, मेहकर, लोणार, हिवरा आश्रम येथे कोविड केअर सेंटरला १००-१०० गाद्या आपण दिल्या. तसेच रुग्णांना ड्रायफ्रुट, चांगल्या दर्जाचा नाष्टा दिला जाईल. सर्व कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची गैरसोय होणार नाही. यावेळी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत, प्रा. बळिराम मापारी, काँग्रेसचे राज्य सरचिटणीस शाम उमाळकर, सभापती माधवराव जाधव, गटनेते संजय जाधव, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, तालुकाप्रमुख सुरेश वाळुकर, राष्ट्रीय कॉग्रेसचे जिल्हा पदाधिकारी गिरिधर पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, तहसीलदार डॉ. संजय गरकल, वैद्यकीय अधीक्षक शाम ठोंबरे, तालुका आरोग्याधिकारी महेंद्र सरपाते, नगर परिषद मुख्याधिकारी सचिन गाडे, कार्यकारी संचालक अजय उमाळकर, उपसभापती बबनराव तुपे, दुर्गाप्रसाद रहाटे, डॉ. सचिन जाधव, सह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बालाजी लाहोरकर, प्राचार्य गजानन निकस व सर्व कर्मचारी हजर होते. उपनगराध्यक्ष जयचंद बाठिया यांनी संचालन, तर नगरसेवक विकास जोशी यांनी आभार मानले.
मंत्रिमहोदयांनी केले कौतुक
राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे व गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी १ मे राेजी या कोविड केअर सेंटरला भेट देऊन खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर यांचे कौतुक केले. असाच उपक्रम प्रत्येक लोकप्रतिनिधींनी राबविल्यास शासनावरचा ताण कमी होऊन रुग्णांना मदत होईल, असे मत दोन्ही मंत्र्यांनी व्यक्त केले़