सिंदखेड राजा निवडणूक निकाल : शशिकांत खेडेकर पुन्हा बाजी मारणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 08:31 AM2019-10-24T08:31:45+5:302019-10-24T08:32:11+5:30
Summary: Sindkhed Raja Vidhan Sabha Election Results 2019:
सिंदखेड राजा : विधानसभेच्या मातृतीर्थ सिंदखेड राजा मतदारसंघात यावर्षी तिरंगी लढत आहे. ऐनवेळी कोण बाजी मारतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
. दरम्यान, सकाळी आठ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली असून येथील निकाल काय लागतो याकडे मतदारसंगाचे लक्ष लागून आहे.
गेल्यावेळी शिवसेनेचे डॉ. शशिकांत खेडेकर यांनी बाजी मारली होती. यंदा ते आपला गड कायम ठेवतात की काही उलटफेर होतो याबाबत अनिश्चितता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, वंचित बहुजन आघाडीकडून सविता मुंडे रिंगणात आहेत. तीनही उमेदवारांनी जोमाने प्रचार केला आहे. आता मतदारराजा कुणाला कौल देतो हे अवघ्या काही तासात स्पष्ट होईल.
सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात एकूण तीन लाख ११ हजार ५५१ मतदार असून त्यापैकी एक लाख ९९ हजार ३९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्याची टक्केवारी ६२.८५ एवढी होती. २०१४ मध्ये डॉ. शशिकांत खेडेकर यांनी ६४ हजार,२०३ मते घेऊन त्यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविणाºया रेखा खेडेकर यांचा पराभव केला होता.