सिंदखेड राजा : नशीराबाद येथे विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतकर्‍याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 01:33 AM2018-02-03T01:33:45+5:302018-02-03T01:35:27+5:30

सिंदखेड राजा : तालुक्यातील नशीराबाद येथील शेतकर्‍याचा महावितरणच्या लोंबकळणार्‍या तारांना स्पर्श होऊन झालेल्या विचित्र अपघातामध्ये मृत्यू झाला. ही घटना दोन फेब्रुवारीला दुपारी घडली.

Sindkhed Raja: The touch of the electric star at Nashirabad and the death of the farmer | सिंदखेड राजा : नशीराबाद येथे विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतकर्‍याचा मृत्यू

सिंदखेड राजा : नशीराबाद येथे विद्युत तारेचा स्पर्श होऊन शेतकर्‍याचा मृत्यू

Next
ठळक मुद्देही घटना दोन फेब्रुवारीला दुपारी घडलीबंडू नारायण राठोड असे मृत पावलेल्या शेतकर्‍याचे नाव 

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेड राजा : तालुक्यातील नशीराबाद येथील शेतकर्‍याचा महावितरणच्या लोंबकळणार्‍या तारांना स्पर्श होऊन झालेल्या विचित्र अपघातामध्ये मृत्यू झाला. ही घटना दोन फेब्रुवारीला दुपारी घडली.
बंडू नारायण राठोड (२५) असे या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे. २ फेब्रुवारीला बंडू नारायण राठोड हे शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. दरम्यान, शेतामधून गेलेल्या वीज वाहिनीच्या तारा खाली लोंबकळलेल्या होत्या. कापूस वेचणी दरम्यान वार्‍याच्या झुळकीमुळे या तारांना बंडू नारायण राठोड यांचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जोरदार शॉक लागल्याने ते गंभीर जखमी झाले. परिणामी, त्यांना सहकार्‍यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी राम रायसिंग राठोड यांनी सिंदखेड राजा पोलिसांत तक्रार दिली असून, पोलिसांनी प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक नंदलाल खारडे, राजू घोलप, समाधान गीते करीत आहेत. 

Web Title: Sindkhed Raja: The touch of the electric star at Nashirabad and the death of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.