सिंदखेडराजा : रेतीचे बेकायदेशीर उत्खनन; ७६ रेतीमाफीयांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:00 IST2017-12-25T00:59:45+5:302017-12-25T01:00:02+5:30
सिंदखेडराजा : तालुक्यातून वाहणार्या खडकपूर्णा नदीसह अन्य नद्यामधून रेतीचे अवैध उत्खनन होत असून, रेतीमाफिया तालुक्यात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महसूल यंत्रणा कारवाईसाठी सक्षम असली तरी रेतीची अवैध वाहतूक व उत्खनन सुरूच आहे. दरम्यान, आठ महिन्यात महसूल विभागाने तब्बल ७६ रेतीमाफियांवर कारवाई करून त्यांच्याकडून १३ लाख ७0 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

सिंदखेडराजा : रेतीचे बेकायदेशीर उत्खनन; ७६ रेतीमाफीयांवर कारवाई!
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : तालुक्यातून वाहणार्या खडकपूर्णा नदीसह अन्य नद्यामधून रेतीचे अवैध उत्खनन होत असून, रेतीमाफिया तालुक्यात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. महसूल यंत्रणा कारवाईसाठी सक्षम असली तरी रेतीची अवैध वाहतूक व उत्खनन सुरूच आहे. दरम्यान, आठ महिन्यात महसूल विभागाने तब्बल ७६ रेतीमाफियांवर कारवाई करून त्यांच्याकडून १३ लाख ७0 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
तहसीलदार संतोष कणसे व नायब तहसीलदार एच.डी.वीर यांच्या संयुक्त पथकाने याप्रकरणी कारवाई केली आहे. सिंदखेडराजा तालुका हा विदर्भ आणि मराठवाड्याच्या सरहद्दीवर आहे. नदीपात्रामधील अवैध रेती उपसा करणारे रेती माफीया टीप्पर, ट्रॅक्टर, ट्रकद्वारे मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, मंठा, शेवली, अंबड या भागात रेतीची तस्करी करुन नफा मिळवतात. मधल्या काळात रेती माफीयांनी मोठय़ा प्रमाणावर रेतीचा अवैध उपसा केला होता. कणसे तथा एच. डी. वीर यांनी धडक कारवाई करीत त्यास लगाम लावण्याचा प्रयत्न केला. १ एप्रिल ते ३0 डिसेंबर पर्यंत ६८ प्रकरणात १२ लक्ष ३२ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला तर २ डिसेंबर ते १३ डिसेंबर १७ पर्यंत ८ प्रकरणात १ लक्ष ३८ हजार दंड वसूल करण्यात आला. या कारवाईत बी.बी.वाघ, घुगे, काकडे, राहुल देशमुख, आर.डी.वायाळ, एम.आर.नागरे, एस.एस.मांडगे यांचाही सहभाग होता.