मेहकर पंचायत समितीसमोर शेलगाव ग्रामपंचायत सदस्यांचा बैठा सत्याग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 05:20 PM2017-12-19T17:20:34+5:302017-12-19T17:23:29+5:30
शेलगांव देशमुख : येथील बेकायदेशीर जागेच्या नोंदीचा फेरफार दुरूस्त करण्यात यावा तसेच नमुना आठ अ देण्यात यावे, या मागणीसाठी ग्रा.पं.सदस्यांनी मेहकर पंचायत समितीसमोर १८ डिसेंबर पासून बैठा सत्याग्रह सुरु केला आहे.

येथील बेकायदेशीर जागेच्या नोंदीचा प्रश्न ग्रा.प.सदस्यांनी अनेकवेळा निवेदनाद्वारे अधिकाºयांसमोर मांडला. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने १८ डिसेंबर रोजी शेलगांव देशमुख येथील ग्रा.पं.सदस्य एकनाथ खराट, दशरथ सदार, गजानन पवार, इरफान शहा, शेख हैदर, गजानन म्हस्के व विष्णू आखरे सह गावातील केशव जोशी, रमेश बियाणी, हमीद शावकार, शंकर तोतरे, गफार शहा, रामेश्वर कुटे, बालु आखरे, शेषराव तोतरे, विनोद खडारे, राहुल कांबळे, विलास कड्डक यांनी पंचायत समिती मेहकर बैठा सत्याग्रह सुरु केला आहे.