सहा उमेदवारांचे अर्ज मागे

By admin | Published: October 1, 2014 12:46 AM2014-10-01T00:46:57+5:302014-10-01T00:46:57+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील ६ उमेदवारांनी अर्ज मागे; १५४ उमेदवारांचे अर्ज कायम.

Six Candidates Application Form | सहा उमेदवारांचे अर्ज मागे

सहा उमेदवारांचे अर्ज मागे

Next

बुलडाणा : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात छानणीनंतर १६0 उमेदवार होते. त्यापैकी ६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता १५४ उमेदवारांचे अर्ज कायम आहेत. अर्ज मागे घेणार्‍यांमध्ये चिखली २, जळगाव जामोद १, सिंदखेडराजा २ व मेहकरमध्ये १ अर्ज मागे घेण्यात आला. बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी बुलडाणा विधानसभा मतदारसंघासाठी २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी विलास शंकर तायडे अपक्ष यांचा अर्ज एबी फॉर्म व दहा सूचकांच्या सह्या नसल्यामुळे रद्द करण्यात आला होता. आता २५ जणांचे उमेदवारी अर्ज आहेत. चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दत्ता गवळी, एकनाथ जाधव, पदमनाथ बाहेकर, विशाल भंडारे यांचे अर्ज रद्द करण्यात आले. तर आज जालींधर बुधवत, श्रीराम सपकाळ यांनी अर्ज मागे घेतले आहेत.

Web Title: Six Candidates Application Form

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.