जिल्ह्यात कोरोनाने सहा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:30 AM2021-04-05T04:30:33+5:302021-04-05T04:30:33+5:30

प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये ६९९ प्रयोगशाळेतील व रॅपिड टेस्टमधील ३२३ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून ६७२, तर रॅपिड ...

Six deaths by corona in the district | जिल्ह्यात कोरोनाने सहा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाने सहा मृत्यू

Next

प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये ६९९ प्रयोगशाळेतील व रॅपिड टेस्टमधील ३२३ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून ६७२, तर रॅपिड टेस्टमधील ४०७६ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये बुलडाणा शहर व तालुका २३८, खामगांव तालुक्यात १४४, शेगांव चार, देऊळगावराजा तालुका व शहरात ५७, चिखली शहरासह तालुका १०८, मेहकर ८१, मलकापूर शहर व तालुका १३४, नांदुरा ७०, लोणार २८, मोताळा २३, जळगांव जामोद ७३, सिंदखेडराजा ४९ आणि संग्रामपूर शहर व तालुका १३ संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात १०२२ रूग्ण आढळले आहे.

या ठिकाणी झाले मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाने पाच मृत्यू झाले आहेत. उपचारादरम्यान चिखली येथील ७० वर्षीय महिला, महावीर नगर, बुलडाणा येथील ७० वर्षीय महिला, देऊळघाट ता. बुलडाणा येथील ७५ वर्षीय महिला, गोंधनपूर ता. खामगांव येथील ७९ वर्षीय महिला, रेखा प्लॉट, खामगांव येथील ७१ वर्षीय महिला व वाडी, खामगांव येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

९४५ रुग्णांची कोरोनावर मात

९४५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. तसेच आजपर्यंत २३७३०८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ३४७३६ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या ३४७३६ आहे. आज रोजी ३५१४ नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल २३७३०८ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ४१०७० कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ३४७३६ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Web Title: Six deaths by corona in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.