सात दिवसांत सहा मृत्यू, २९४ नव्या रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:35 AM2021-01-25T04:35:18+5:302021-01-25T04:35:18+5:30
बुलडाणा : काेराेना लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर लाेकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, पुन्हा रुग्णवाढीचा वेग वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गत ...
बुलडाणा : काेराेना लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर लाेकांमध्ये बेफिकिरी वाढली असून, पुन्हा रुग्णवाढीचा वेग वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गत सात दिवसांत सहा जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला असून, २९४ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे, प्रशासनाची चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला ६२ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आला हाेता. त्यानंतर रुग्णांची संख्या कमी, जास्त हाेत आहे. १६ जानेवारीपासून देशभरात काेविशिल्डचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर ग्रामस्थांमध्ये बेफिकिरी वाढल्याने काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहे. जानेवारी महिना सुरू हाेण्यापूर्वी जिल्ह्यात १५७ जणांचा मृत्यू झाला हाेता. पाहता पाहता जानेवारी अखेरपर्यंत हा १६४ पर्यंत आला आहे. लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याचा अनेक जण दुरपयाेग घेत असल्याचे चित्र आहे. लग्नसमारंभात किती लाेकांनी उपस्थित रहावे, याविषयी जिल्हा प्रशासनाने आदेश दिलेले आहेत. मात्र, सध्या लग्न समारंभामध्ये माेठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. ग्रामीण भागात आठवडी बाजारांनाही सुरुवात झाली आहे. यामध्ये अनेक जण मास्कही लावत नसल्याने काेराेना संसर्ग वाढत आहे. जिल्ह्यात १७ जानेवारी राेजी ४४ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला तर एकाचा मृत्यू झाला. १९ जानेवारी राेजीही एकाचा मृत्यू झाला, तर ४४ जण पाॅझिटिव्ह आले. २० जानेवारी राेजी दाेघांचा मृत्यू झाला, तर ५२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. २३ जानेवारी राेजी एकाचा मृत्यू, तर २२ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
आणखी २९ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात रविवारी २९ जणांचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ९२३ काेराेना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.पाझिटिव्ह रुग्णांमध्ये चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर २, मुंगसरी १, शेलूद १, भिवगाव १, चिखली शहरातील तीन , दे. राजा शहर ३, दे. राजा तालुका सिनगाव जहागीर १ , लोणार शहर २, मेहकर तालुका हिवरा आश्रम १, बुलडाणा शहरातील सात , मोताळा तालुका वडगाव ३, सि. राजा तालुका वर्दडी १, उमरद १, मूळ पत्ता जालना येथील एकाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच ३९ जणांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.