बुलढाण्यात वेगवेगळ्या दोन रस्ता अपघातात सहा जखमी; एक गंभीर
By अनिल गवई | Published: November 16, 2023 09:33 PM2023-11-16T21:33:40+5:302023-11-16T21:33:51+5:30
जखमींमध्ये जनुना येथील पाच जणांचा समावेश
खामगाव: तालुक्यातील जनुना चौफुली आणि जळका तेली येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातात सहा जण जखमी झाले. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास झालेल्या या अपघातात एकाची प्रकृती गंभीर असून, जनुना या एकाच गावातील पाच जणांचा जखमींमध्ये समावेश आहे. तर लाखनवाडा येथील एक जण जखमी झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमरावती येथील श्रेयांस अनिल सुराणा, त्यांची पत्नी रोमल आणि मुलगा तीर्थ हे तिघे एमएच १२ एलपी ५७०१ या कारने बुलढाणाकडे जात होते. दरम्यान, खामगावगाव औरंगाबाद रोडवरील जनुना चौफुलीवर एमएच २८ बीपी ००७५ ही दुचाकी आणि कार यांच्यात अपघात झाला. दुचाकीस्वारांना वाचविण्याच्या प्रयत्नात कार दुभाजकावर जाऊन धडकली. यावेळी कारमधील एअर बँग उघडल्याने कारमधील ितघे सुरक्षीत आहेत. जखमींमध्ये दुचाकीवरील तिघे जखमी झाल्याचे समजते. अपघात घडताच प्रत्यक्षदशीर्नी अपघातातील जखमींना खामगाव येथील सामान्य रूग्णालयात हलविले. या घटनेची माहिती मिळताच, जनुना येथील नागरिकांनी घटनास्थळी आणि सामान्य रूग्णालयात धाव घेतली होती.
जळका येथे दोन दुचाकी धडकल्या
दुसरा अपघात जळका तेली नजीक घडला. यात दोन दुचाकी समोरा समोर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघे जखमी झाले.
अशी आहेत जखमींची नावे
दोन्ही अपघातात जनुना येथील सुरेश रामभाऊ सुळोकार, रोहीत श्याम रोकडे, विशाल मोहन वाकोडे, विशाल मोहन कोंडे, आकाश विजय पारसकार या पाच जणांसोबत दीपेश दीपू पवार (१५)रा. लाखनवाडा याचा समावेश आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. यातील तिघांना खामगाव येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. तर दोघांना अकोला येथे हलविण्यात आल्याचे समजते.