सहा महिन्याच्या बाळाचा डेंग्यूच्या तापामुळे मृत्यू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 12:44 AM2017-10-05T00:44:07+5:302017-10-05T00:45:00+5:30
बुलडाणा : शहरापासून अगदी जवळ असलेल्या कोलवड येथे एका सहा महिन्याच्या बाळाचा डेंग्युच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणार्यांवर कारवाई करून गावात साफसफाई अभियान राबविण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी एका निवेदनाद्वारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

कोलवड येथील अर्णव सागर जाधव या सहा महिन्याच्या बालकास ताप येत असल्याने त्याला २३ सप्टेंबर रोजी येथील डॉ.जाधव यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती करण्यात आले होते; परंतु त्याचा ताप उतरत नसल्याने डॉ.जाधव यांनी चेकअप करून त्याला डेंग्यूचा ताप असल्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे २६ सप्टेंबर रोजी अर्णवला तातडीने औरंगाबाद येथील अमृत बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याच्या विविध तपासण्या करून त्याला डेंग्यू असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले; परंतु २९ सप्टेंबर रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून गावात मोठय़ा प्रमाणावर डासांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य कर्मचार्यांचे गावाकडे लक्ष नाही. पावसाळ्यात साचलेल्या गटारामध्ये गप्पी मासे सोडण्यात आले नाही. आरोग्य कर्मचारी एका तासासाठी गावात येऊन पसार होतात. त्यामुळे एका सहा महिन्याच्या बालकाला जीव गमवावा लागला आहे.
त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून गावात साफसफाई करण्यात यावी, अशी मागणी शंकर जाधव, प्रकाश जाधव, संजय जाधव, विनोद जाधव, नाजुकराव जाधव, भुजंगराव जाधव, गुलाबराव जाधव, ओंकार जाधव, शेषराव हिवाळे, राजू जाधव, प्रकाश जाधव, सागर जाधव, भानुराव जाधव, गजानन जाधव, संदीप जाधव, बाबूराव जाधव, प्रभाकर वैद्य, योगेश जाधव, नितीन सपकाळ, अनंता वैद्य या ग्रामस्थांनी केली आहे.