सहा महिन्यात ४०८ जण झाले बेपत्ता, २६५ मुलींचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:36 AM2021-07-27T04:36:03+5:302021-07-27T04:36:03+5:30
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींबराेबरच १८ वर्षांवरील मुली आणि विवाहिता बेपत्ता हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात ...
बुलडाणा : जिल्ह्यात गत काही दिवसांपासून अल्पवयीन मुलींबराेबरच १८ वर्षांवरील मुली आणि विवाहिता बेपत्ता हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात सहा महिन्यात ४०८ जण बेपत्ता झाले आहेत. यामध्ये २६५ मुली व विवाहितांचा समावेश आहे. तसेच मे २०२१ पर्यंत ५० अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या हाेत्या. त्यापैकी पाेलिसांनी २२ जणींचा शाेध घेतला आहे.
माेबाइल, साेशल मीडियाचा वापर वाढल्याने मुली पळून जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. जिल्ह्यात अल्पवयीन मुलीबराेबर विवाहिताही बेपत्ता हाेत आहेत. वेगवेगळी आमिषे दाखवून मुलींना फूस लावून पळवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. पालकांनी आपल्या मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिल्ह्यात १३९ पुरुषही बेपत्ता झाले आहेत.
आभासी जगाचे आमिष
समाजमाध्यमाच्या माध्यमातून संपर्कात आलेली मुले मुलींना विविध आमिषे दाखवतात. तसेच आभासी जगाचे चित्र रंगवतात. त्याला बळी पडून मुली पळून जातात.
श्रीमंत असल्याचा दावा
समाजमाध्यमावर आपण खूप श्रीमंत असल्याचे भासवूनन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतात. काही भेटवस्तू देऊन ते श्रीमंत असल्याचे भासवत असल्याने मुली पळून जातात.
विवाहिताही पळून जाण्यात आघाडीवर
अल्पवयीन मुलीबरेाबरच विवाहिताही पळून जाण्यात आघाडीवर आहेत. जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान २३, मार्च ते एप्रिलदरम्यान २० , मे ते जून दरम्यान ३३ आणि जुलै महिन्यात आतापर्यंत १० विवाहिता बेपत्ता झाल्या आहेत.
मुला-मुलीचे चुकीचे पाऊल पडू नये म्हणून व्हा त्यांचे मित्र !
मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्याशी संवाद साधा.
मुलगी माेबाईलवर सतत बाेलत असेल तर चेक करा.
मुलींबराेबर संवाद चांगला ठेवा. त्यांना प्रेम द्या.
अनेक वेळा कुटुंबीयांकडून प्रेम मिळत नसल्याने मुली समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्रेम शाेधत असतात. मुलीचे मित्र म्हणून राहिल्यास ती चुकीचे पाऊल टाकणार नाही.