बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सहा रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 11:24 AM2020-06-20T11:24:02+5:302020-06-20T11:24:23+5:30

पुन्हा सहा जण कोरोना बाधीत आढळून आले असून बाधितांची संख्या १४८ वर पाहोचली आहे.

Six more corona patients were raised in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सहा रुग्ण वाढले

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे आणखी सहा रुग्ण वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात १९ जून रोजी पुन्हा सहा जण कोरोना बाधीत आढळून आले असून बाधितांची संख्या १४८ वर पाहोचली आहे. यातील चार कोरोना बाधीत रुग्ण हे १८ जून रोजी रात्री उशिरा आढळून आले तर मलकापूर येथील दोन बाधीतांचा रिपोर्ट १९ जून रोजी सकाळी आला. त्यामुळे सध्या जिल्ह्यात प्रत्यक्षात उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ४८ आहे.
अकोला येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या तब्बल १०३ अहवालांपैकी ९७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उर्वरित सहा जणांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवाल हे मलकापूर येथील ६० व ३८ वर्षीय पुरुषाचे आहे. दरम्यान एक २३ वर्षीय महिला ही पॉझिट्हि आली आहे. जळगांव जामोद येथील ५० वर्षीय पुरूष, शेगांव येथील ५८ वर्षीय महिला व नांदुरा येथील ४५ वर्षीय पुरुषांचा बाधितांमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात सध्या सिंदखेड राजा, बुलडाणा, मोताळा, चिखली, दे.राजा तालुक्यात एकही अ‍ॅक्टीवह रुग्ण नाही. ही जिल्ह्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. दुसरीकडे आतापर्यंत ९५ कोरोना बाधीत रुग्ण बरे झाल्याने त्यांना वैद्यकीय संकेतानुसार रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६४ टक्क्यांवर आहे. सध्या जिल्ह्यात ४८ कोरोना बाधीत रुग्णांना बुलडाणा, शेगाव आणि खामगाव येथील आयसोलेशन कक्षात उपचार करण्यात येत आहेत.
दुसरीकडे २,०४९ संदिग्धांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत तर जिल्ह्यात आतापर्यंत सहा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. १९ जून रोजी प्राप्त अहवालापैकी ९७ अहवाल निगेटीव्ह आले आहेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी दिली.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बाधीतांचा वाढता आकडा पाहता त्रिस्तरीय रुग्णालयाची रचना प्रभावीपणे कार्यान्वीत करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. १८ जून रोजीच जिल्ह्यात सामाजिक बांधिलकीतून मदत करणाऱ्या तीन व्यक्तींच्या पुढाकारातून तब्बल ५४ आॅक्सीजन सिलींडर मिळाले आहेत. कोवीड हेल्थ सेंटरमध्ये ते देण्यात येणार आहे. दुसरीकडे कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू होणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने सज्जता सध्या ठेवली आहे.

 

Web Title: Six more corona patients were raised in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.