बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाने आणखी सहा मृत्यू; १०२२ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 11:42 AM2021-04-05T11:42:15+5:302021-04-05T11:45:10+5:30

CoronaVirus Cases : ४७४८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, १०२२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. 

Six more deaths by corona in Buldana district; 1022 positive | बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाने आणखी सहा मृत्यू; १०२२ पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाने आणखी सहा मृत्यू; १०२२ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण आता वाढले आहे. ४ एप्रिल रोजी सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी  पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५ हजार ७७० अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४७४८ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, १०२२ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. 
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये ६९९ प्रयोगशाळेतील  व रॅपिड टेस्टमधील ३२३ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून ६७२, तर रॅपिड टेस्टमधील ४०७६ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये बुलडाणा शहर व तालुका  २३८, खामगांव तालुक्यात १४४, शेगांव चार कोरोना बाधित आढळून आहेत आहेत. 
देऊळगावराजा तालुका व शहरात ५७, चिखली शहरासह तालुका १०८, मेहकर ८१, मलकापूर शहर व तालुका १३४, नांदुरा ७०, लोणार २८, मोताळा २३, जळगांव जामोद ७३, सिंदखेडराजा ४९ आणि संग्रामपूर शहर व तालुका १३ संशयित व्यक्ती पॉझिटिव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात १०२२ रूग्ण आढळले आहे. कोरोनामुळे रविवारी आणखी सहा मृत्यू झाले असून, मृत्यू वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या ठिकाणी झाले मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाने पाच मृत्यू झाले आहेत. उपचारादरम्यान चिखली येथील ७० वर्षीय महिला, महावीर नगर, बुलडाणा येथील ७० वर्षीय महिला, देऊळघाट ता. बुलडाणा येथील ७५ वर्षीय महिला, गोंधनपूर ता. खामगांव येथील ७९ वर्षीय महिला, रेखा प्लॉट, खामगांव येथील ७१ वर्षीय महिला व वाडी, खामगांव येथील ५७ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Six more deaths by corona in Buldana district; 1022 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.