जिल्ह्यातील सहा पोलीस झाले पीएसआय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:13+5:302021-06-02T04:26:13+5:30
३१ मे रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला आहे. पीएसआय परीक्षा २०१३ मध्ये दिलेल्या अंमलदारांची निवडसूची २०२०-२१ मधील सेवा ...
३१ मे रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
पीएसआय परीक्षा २०१३ मध्ये दिलेल्या अंमलदारांची निवडसूची २०२०-२१ मधील सेवा ज्येष्ठतेनुसार स्थानापन्न पोलीस उपनिरीक्षकांच्या २५ टक्के कोट्यातील रिक्त जागेत शासन निर्णयानुसार पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याआनुषंगाने आस्थापना विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (मुंबई) राजेश प्रधान यांनी ३१ मे रोजी आनुषंगिक यादी निर्गमित केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाच्या अधिन राहून पदोन्नतीच्या कोट्यातील सर्व रिक्तपदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार ३१ मे रोजी जारी करण्यात आलेल्या राज्यातील ६१९ अंमलदारांची पदोन्नती नि:शस्त्र पोलिस उपनिरीक्षक पदावर करण्यात आली आहे.
यामध्ये बुलडाणा जिल्हा पोलीस दलात कार्यरत सहा जणांचा समावेश आहे. गजानन नामदेव मोरे, रमेश साहेबराव बनसोडे, रतनसिंग बोराडे, मदन ज्ञानबा गिते, अब्दुल मोबीन अ. बशीर आणि किसन रेवा राठोड यांचा यामध्ये समावेश आहे.