वर्षाला सहा हजार मेगावॅट वीजनिर्मिती

By admin | Published: August 28, 2015 12:16 AM2015-08-28T00:16:34+5:302015-08-28T00:16:34+5:30

राज्य शासनाकडून अंमलबजावणी; अक्षय्य ऊर्जा ठरते आहे वरदान.

Six thousand MW of electricity annually | वर्षाला सहा हजार मेगावॅट वीजनिर्मिती

वर्षाला सहा हजार मेगावॅट वीजनिर्मिती

Next

बुलडाणा : राज्यात विजेची वारंवार निर्माण होणार्‍या टंचाई लक्षात घेता, अक्षय्य ऊर्जास्रोतांचा वीजनिर्मि तीसाठी वापर हे राज्यासाठी वरदान ठरले आहे. केंद्रशासनाच्या धर्तीवर राज्यात स्थापित करण्यात आलेल्या अक्षय्य ऊर्जा निर्मिती संचयनीद्वारे वर्षाला ६ हजार ४८६ मेगावॅट वीजनिर्मिती केली जात आहे. पवन, सौर, जैविक, बायोगॅस, सागरी लाटा, भू-औष्णिक आदी स्वच्छ आणि पर्यावरणपूरक अक्षय्य ऊज्रेचे स्रोत आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या संस्थेस ऊर्जा संवर्धन कायदा २00१ च्या तर तुदीचे समन्वयन, विनियमन व अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने अधिसूचित केले आहे. अक्षय्य ऊर्जा प्रसार व विकास आणि ऊर्जा संवर्धन कार्यक्रमांची अंमलबजावणी यासाठी महाऊर्जा सक्रिय आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर अक्षय्य ऊर्जास्रोतांमधून १0 टक्के वीज खरेदीचे उद्दिष्ट गाठण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार अक्षय्य ऊर्जास्रोतांद्वारे वीजनिर्मितीसाठी धोरणे व प्रोत्साहनपर बाबी जाहीर करण्यात आल्या आहेत. अक्षय्य ऊर्जास्रोतांद्वारे वीजनिर्मिती प्रकल्पांच्या स्थापित क्षमतेनुसार अक्षय्य ऊर्जा प्रकल्पात राज्यात दरवर्षी ६ हजार ४८६ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे.

Web Title: Six thousand MW of electricity annually

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.