कोविडवर मात करणाऱ्या सहा वर्षीय चिमुकल्यास वृक्षरोप देऊन गौरविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:36 AM2021-05-18T04:36:02+5:302021-05-18T04:36:02+5:30
माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिखली येथील डॉ. हेडगेवार कोविड रूग्णालयास रविवारी भेट दिली, यावेळी ...
माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिखली येथील डॉ. हेडगेवार कोविड रूग्णालयास रविवारी भेट दिली, यावेळी त्यांच्यासोबत माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे, आ. आकाश फुंडकर आ. श्वेता महाले पाटील, माजी आमदार चैनसुख संचेती, विजयराज शिंदे उपस्थित होते. या भेटीदरम्यान ना. फडणवीसांनी शहर व परिसरातील नागरिकांना उपचाराकरिता मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासू नये, याकरिता शिक्षण प्रसारक मंडळ, चिखलीद्वारा संचालित डॉ. हेडगेवार आयुर्वेद रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशा ५२ खाटांचे कोविड रुग्णालय कठीण काळात सुरू केले व सेवा अविरत सुरू आहे. त्याबद्दल व्यवस्थापनाचे कौतुक केले. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉ. प्रियेश जैस्वाल, डॉ. राहुल राजपूत यांचा सत्कार देवेंद्र फडणवीस यांनी केला व रुग्णसेवा बाबत समाधान व्यक्त केले. कोविडवर मात केलेल्या सहा वर्षीय चि. अथर्व भिवाळे व गजानन आगळे या रुग्णांना वृक्षाचे रोपटे देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण शेटे, सचिव प्रेमराज भाला, कोषाध्यक्ष अॅड. विजय कोठारी, संचालक तथा चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त, पंडितराव देशमुख, विनोद वाघ, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, डॉ. सौरभ कोठारी, सुहास शेटे, प्राचार्य डॉ. ज्योत्स्ना गुल्हाने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश काछवाल आदी उपस्थित होते.