शेगावच्या सौंदर्यात भर घालणारा स्काय वॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2017 12:41 AM2017-05-23T00:41:21+5:302017-05-23T00:41:21+5:30

शेगाव : शेगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि भाविकांच्या सुविधेकरिता महत्त्वपूर्ण आणि उपयोगी स्कॉय वॉक लवकरच भक्तांच्या सेवेत आपल्याला पहावयास मिळणार आहे.

Sky Walk that covers Shegaon's beauty | शेगावच्या सौंदर्यात भर घालणारा स्काय वॉक

शेगावच्या सौंदर्यात भर घालणारा स्काय वॉक

Next

विजय मिश्रा।
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : शेगाव शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि भाविकांच्या सुविधेकरिता महत्त्वपूर्ण आणि उपयोगी स्कॉय वॉक लवकरच भक्तांच्या सेवेत आपल्याला पहावयास मिळणार आहे.
आनंदसागर विसावा ते गजानन महाराज मंदिर अशा शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या उनाड नाल्यावर १२०० मीटर लांबीचा स्कॉय वॉक जलदगतीने उभारल्या जात आहे. याच नाल्यावर श्री गजानन महाराज संस्थानला लागून असलेल्या उनाड नाल्यावर काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या मंजुरीप्रमाणे गजानन महाराज संस्थानकडून अगोदरच भव्य दर्शनबारी निर्माण करण्यात आली आहे.
आता शेगाव विकास आराखड्यामध्ये शासनाने समाविष्ट केल्याप्रमाणे आनंदसागर विसावा भक्तनिवास आणि आनंद विहारमध्ये थांबणाऱ्या हजारो भक्तांना कुठल्याही रहदारीच्या अडथळ्याशिवाय पायदळ दर्शनमार्ग म्हणून या स्कॉय वॉकचा वापर करता येणार आहे.
या स्कॉय वॉकची लांबी १२०० मीटर असून, २५ कोटी रुपये निधीची तरतूद आहे. या स्कॉय वॉकचे काम आर.ई.इन्फ्रा. मुंबई करीत असून, अवाढव्य अशा पायलीग मशीनद्वारे स्कॉय वॉकच्या पिल्लर उभारणीचे काम जलदगतीने करण्यात येत आहे. पिल्लर उभारणी जवळपास ५० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली असून, येणाऱ्या दिवाळीला स्कॉय वॉक पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या स्कॉय वॉकला एलईडी लाईट व्यवस्था, तीन ठिकाणी प्रसाधनगृह तर एक कॅन्टीनची उभारणी यावर करण्यात येणार आहे.
हा स्कॉय वॉक शहरातील मध्यवस्तीमधून जाणारा असल्याने येणाऱ्या काळात शेगाव शहराच्या सौंदर्यात या स्काय वॉकमुळे निश्चितच भर पडणार असून, शहरातील वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने मोलाचा ठरणार एवढे मात्र खरे.

Web Title: Sky Walk that covers Shegaon's beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.