‘चले जाव...’चा नारा स्वातंत्र्याचा मंत्र ठरला - अनंतराव वानखेडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:39 AM2021-08-12T04:39:22+5:302021-08-12T04:39:22+5:30

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात शहर व तालुका काँग्रेस कमिटीला ...

The slogan 'Leave ...' became the mantra of freedom - Anantrao Wankhede | ‘चले जाव...’चा नारा स्वातंत्र्याचा मंत्र ठरला - अनंतराव वानखेडे

‘चले जाव...’चा नारा स्वातंत्र्याचा मंत्र ठरला - अनंतराव वानखेडे

Next

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात शहर व तालुका काँग्रेस कमिटीला ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, माजी नगराध्यक्ष विलासराव चनखोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला़ अध्यक्षस्थानी ॲड. अनंतराव वानखेडे हाेते़ या कार्यक्रमाला भूषणभैया देशमुख, मेहकर शहर काँग्रेसचे अध्यक्ष कलीम खान, भीमशक्तीचे राज्य सरचिटणीस भाई कैलास सुखधाने, सेवादल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शैलेश बावस्कर, चित्रांगन खंदारे, एनएसयूआय प्रदेश सरचिटणीस वसीम कुरेशी, व्यापार व उद्योग काँग्रेस सेलचे शहराध्यक्ष सुरेश मुंदडा माजी नगरसेवक संजय म्हस्के, अशोक इंगळे, युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप बोरे, वैभव उमाळकर, प्रा. विनोद पऱ्हाड, कुंडलिक बाप्पू देशमुख, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अक्षय इनकर, किशोरदादा गवई, अल्पसंख्याक विभागाचे शहराध्यक्ष युनूस पटेल, महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा आरतीताई दीक्षित, नारायण पचेरवाल, ॲड. गोपाल पाखरे, प्रा. संजय वानखेडे, छोटू गवली, सुखदेव ढाकरके, मुनाफ खान, नारायण इंगळे, सुनील अंभोरे, शत्रुघ्न बाजड, किशोर मरकड, नीलेश काळे, शाहू गवली, आकाश अवसरमोल, आकाश ढगे, सचिन तुपे, विठ्ठल बोरकर, कपिल चौधरी, अविनाश रोकडे, प्रणव गिरी, यश ढगे, शांतनू इंगळे, पिरू परसूवाले, इमाम गवली, अय्युब नौरंगाबादी, रहीम गवली, रवी पवार, सुमेध वानखेडे, आकाश वाठोरे, आदित्य मोरे, धीरज गवई, सौरभ कलमबे, किशोर अडेलकर, पीयूष पांडगले आदींची उपस्थिती होती. संचालन तथा प्रास्ताविक शहराध्यक्ष कलीम खान यांनी केले. आभार युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस दिलीप बोरे यांनी मानले.

Web Title: The slogan 'Leave ...' became the mantra of freedom - Anantrao Wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.