मेहकर येथील लघु व्यावसायीकांची जिल्हाधिकारी कार्यालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 02:51 PM2018-01-25T14:51:40+5:302018-01-25T14:54:38+5:30
मेहकर रस्त्याच्या कामामुळे शेकडो दुकानाचे नुकसान होणार असल्याने विवीध व्यवसाय करुन आपली उपजिवीका करणाºया शेकडो गरीब व्यवसायीकांवर उपासमारीची पाळी येणार असल्याने या लघुव्यवसायीकांनी २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेवून आपल्या मागण्या मांडल्या.
मेहकर : मेहकर शहरामधुन मुंबई-नागपुर या महामार्गाचे काम लवकरच सुरु होणार आहे. यासाठी संबधीत विभागाने शहरातील रस्त्याच्या दोन्ही बाजुचे मोजमाप केलेले आहे. या रस्त्याच्या कामामुळे शेकडो दुकानाचे नुकसान होणार असल्याने विवीध व्यवसाय करुन आपली उपजिवीका करणाºया शेकडो गरीब व्यवसायीकांवर उपासमारीची पाळी येणार असल्याने या लघुव्यवसायीकांनी २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकाºयांकडे धाव घेवून आपल्या मागण्या मांडल्या. मेहकर शहरातुन नागपूर-मुंबई या महामार्गाच्या कामाला लवकरच सुरवात होणार असल्याने संबधीत विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजुचे मोजमाप केलेले आहे. रस्त्याच्या मध्यभागापासून १२-१२ मिटर मोजमाप केलेले आहे. दरम्यान, जिजाऊ चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजुला ३५ वर्षापासून अनेक लहान-मोठे व्यावसायीक दुकाने थाटुन आपला व्यवसाय चालवित आहेत. यामध्ये सुशिक्षीत बेकार तथा गोरगरीब व्यवसायीकांचा सुध्दा समावेश आहे. दिवसभर व्यवसाय करुन आपल्या कु टुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. मात्र रस्त्याच्या कामामुळे शेकडो दुकानाचे नुकसान होणार आहे. रस्त्याच्या दक्षीण भागाला विद्युत पोल असल्याने वेळोवेळी या भागाकडील मोजमाप कमी करण्यात येते तर उत्तर दिशेला असलेल्या दुकानाकडेच मोजमाप सतत जास्तीचे करण्यात येत असल्याचा आरोप या व्यावसायीकांनी केला आहे. जड वाहने व ईतर वाहने जाण्यासाठी मेहकर शहराच्या बाहेरुन बायपास रस्ता आहे. त्यामुळे शहरातून वाहनांची वर्दळ कमी राहणार आहे. शासनाने २४ मीटर ऐवजी २० मीटरच रस्ता करावा, अशी मागणी संतोष पवार, युनुस पटेल, योगेश महाजन, गजु देशमुख, प्रल्हाद भिसे, शिवशंकर तायडे, कलीम खान, संतोष अग्रवाल, राहुल देशमुख, अजीम खान, शेख आरीफ, प्रकाश मोरे, राजेक चौधरी, शेख अजीम, पांझडे यांचेसह शेकडो व्यवसायीकांनी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)