अल्प शेतकऱ्यांना होणार ‘नाफेड’च्या खरेदी केंद्राचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2019 05:12 PM2019-11-08T17:12:55+5:302019-11-08T17:13:59+5:30

अल्प शेतकºयांना होणार ‘नाफेड’च्या खरेदी केंद्राचा लाभ

Small farmers will benefit from 'Nafed' shopping center | अल्प शेतकऱ्यांना होणार ‘नाफेड’च्या खरेदी केंद्राचा लाभ

अल्प शेतकऱ्यांना होणार ‘नाफेड’च्या खरेदी केंद्राचा लाभ

googlenewsNext
ेवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: किमान आधारभूत दराने शेतमाल खरेदी केंद्राचा लाभ यावर्षी अल्प शेतकºयांना होण्याचीच शक्यता अधिक आहे. यावर्षी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने मालाची प्रतवारीही घसरली आहे. त्यामुळे शासनाच्या निकषानुसार एफएक्यू दर्जाचा माल मिळणे कठीण असल्याचे दिसून येते. खामगाव येथे किमान आधारभूत दराने शेतमाल खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्रावर यावर्षी मुग विक्रीसाठी १५ सप्टेबर ते ३० आॅक्टोबर पर्यंत १३५० शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. उडीद व सोयाबीन विक्री करणाºया शेतकºयांसाठी आॅनलाईन नोंंदणी करण्याचा कालावधी १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारपर्यंत उडीद विक्रीसाठी ९२५ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली तर सोयाबीनसाठी ७५० शेतकºयांनी नोंदणी केली. यापैकी मुग या शेतमालाची खरेदी ५ आॅक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज केलेल्या १३५० शेतकºयांपैकी ५५० शेतकºयांना आतापर्यंत एसएमएस पाठविण्यात आले आहेत. तर शुक्रवारी दुपारपर्यंत १९२ शेतकºयांकडून १०८३.१८ क्विंटल मुग खरेदी करून घेण्यात आला. विशेष म्हणजे सोयाबीन व उडीदाची प्रत्यक्ष खरेदी अजुनपर्यंत सुरू झालेली नाही. यावर्षी नाफेडने मुगाला प्रतिक्विंटल ७०५० रूपये, उडीद ५७०० रूपये तर सोयाबीनसाठी ३७१० रूपये असा दर निश्चित केला आहे. किमान आधारभूत दराने शेतमाल खरेदी केंद्राबाबत शेतकºयांच्या संमिश्र प्रतिक्रीया ऐकायला मिळाल्या. सध्या खुल्या बाजारात मुगाचे भाव ५ ते ६ हजाराच्या दरम्यान असल्याने नाफेडच्या खरेदी केंद्रावरच मुग विकणे अनेक शेतकºयांनी पसंत केले. परंतु त्याच बरोबर ज्या शेतकºयांचा माल पावसामुळे खराब झाला आहे, त्यांच्यासाठी या केंद्राचे दार जवळ-जवळ बंदच असल्याचे कळाले. उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकºयांच्या म्हणण्यानूसार आतापर्यंत उडीद व सोयाबीनची खरेदी सुरू व्हायला पाहिजे होती. गत महिन्यातच शेतकºयांच्या घरात उडीद व सोयाबीनही आले आहे, परंतु नाफेडच्या खरेदी केंद्रावर अद्याप खरेदीच सुरू न झाल्याने शेतकºयांना त्यांचा माल खुल्या बाजारात विकावा लागत आहे. यात शेतकºयांचे नुकसान होत आहे. एकंदरीत शेतकºयांच्या घरात माल यायला सुरूवात होण्याआधीच नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाले पाहिजे, असे शेतकºयांचे म्हणने आहे. दुसरीकडे यावर्षी परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने मालाची आवक दरवर्षीच्या मानाने अत्यल्प आहे. जो काही माल शेतकºयांकडे आहे, त्यापैकी पाण्यामुळे खराब झालेला मालच मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे माल असूनही असे शेतकरी नाफेडच्या निकषानुसार आपला माल किमान आधारभूत किंमतीने विकू शकत नसल्याची परिस्थिती यावर्षी आहे. आॅनलाईन नोंदणी केल्यानंतर नाफेडच्या खरेदी केंद्रावर माल आणल्यानंतर तो परत न्यावा लागल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे यावर्षीच्या परिस्थितीचा विचार करता, ‘नाफेड’च्या खरेदी केंद्राचा लाभ अत्यल्प शेतकºयांनाच होणार असल्याचे दिसून येते. दरातील तफावत बघून शेतमाल विक्री!नाफेडच्या खरेदी केंद्रावरील दर व खुल्या बाजारातील दर यातील तफावत बघून शेतकरी निर्णय घेत असल्याचे दिसून येते. मुगाचा विचार केल्यास खुल्या बाजारात ५ ते ६ हजार रूपये प्रतिक्विंटल असा दर आहे, तर नाफेडच्या खरेदी केंद्रावर ७०५० रूपयाचा दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी नाफेडला पसंती देत आहेत. उडीद मात्र खुल्या बाजारात विक्री करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. खुल्या बाजारात उडीदाचे दर सोमवारी साडेआठ हजारांवर पोहचले होते तर नाफेडचे दर ५७०० रूपयांचे आहेत. सोयाबीनच्या दरात मात्र फारशी तफावत दिसून येत नाही. खुल्या बाजारात अगदी २ हजार रूपयांपासून ३९०० रूपयापर्यंत प्रतिक्विंटलचे दर आहेत. नाफेडचे दर ३७१० रूपये आहेत. परंतु खुल्या बाजारात कोणताही माल विक्री करता येत असल्याने व नाफेडला केवळ एफएक्यू दर्जाचाच माल अपेक्षित असल्याने शेतकरी खुल्या बाजाराला पसंती देत आहेत. शिवाय अजुनपर्यंत उडीद व सोयाबीनची प्रत्यक्ष खरेदी नाफेडअंतर्गत सुरू न झाल्याने खुल्या बाजारात शेतकºयांची गर्दी आहें. नाफेडच्या खरेदी केंद्रावर चांगला भाव मिळाल्याने मुगाची विक्री केली आहे. खुल्या बाजारात त्यामानाने कमी भाव आहेत.अशोक जणार्दन गरडशेतकरी, चिंचपूर ता. खामगाव यावर्षी पावसामुळे मालाचा दर्जा घसरला आहे आणि नाफेडला चांगला माल हवा असल्याने खुल्या बाजाराचा पर्याय चांगला वाटतो.विश्वास मुजूमलेशेतकरी आकोली ता. खामगाव.

Web Title: Small farmers will benefit from 'Nafed' shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.