सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदीच्या आदेशाची सर्रास पायमल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:44 PM2019-01-29T14:44:38+5:302019-01-29T14:45:00+5:30
खामगाव : आरोग्यावर होणारा विपरित परिणाम पाहता शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी केली असून या आदेशाचे उल्लंघन करणाºयाविरुध्द शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
खामगाव : आरोग्यावर होणारा विपरित परिणाम पाहता शासनाने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी केली असून या आदेशाचे उल्लंघन करणाºयाविरुध्द शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही धुम्रपान करणाºयाला सार्वजनिक ठिकाणाचा विसर पडून अशाजागी धुम्रपान करणाºयांकडून सर्रास या कायद्याची पायमल्ली केल्या जात असल्याचे दिसून येते.
सार्वजनिक ठिकाणांसह बस स्थानक आणि चक्क बसमध्येही धुम्रपान केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सर्रासपणे सुरू असून, कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाºयांचे मनोबल उंचावत असल्याचे चित्र आहे. गुटखा बंदी असतानाही अनेक ठिकाणी चोरी-छुपे गुटखा विकल्या जातो. त्याचप्रकारे, धुम्रपान बंदी असलेल्या ठिकाणी बिडी, सिगारेट पिणे प्रतिष्ठेचे लक्षणही समजल्या जात आहे. एसटीत बीडी, सिगारेट पिणे गुन्हा असताना, अनेकजण सर्रास या कायद्याची पायमल्ली करताना दिसून येतात. या विरोधात कुणी आवाज उठविल्यास वाहक कोणतीही कारवाई न करता, बीडी, अथवा सिगारेट पिवू नका, एवढ्या विनंतीशिवाय कोणतीही कारवाई करीत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.