मिस्कीनवाडीत सामाजिक उपक्रमांचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:41 PM2017-10-22T23:41:28+5:302017-10-22T23:42:24+5:30

मेहकर: तालुक्यातील मिस्कीनवाडी येथे जागतिक अंध दिनाच्या  पृष्ठभूमीवर आठवडाभर आयोजित विविध सामाजिक उ पक्रमाचा शुक्रवारी समारोप झाला.

The social enterprise concludes in Miskanewadi | मिस्कीनवाडीत सामाजिक उपक्रमांचा समारोप

मिस्कीनवाडीत सामाजिक उपक्रमांचा समारोप

Next
ठळक मुद्देनॅब जिल्हाध्यक्ष डॉ.  यशवंत चवरे, नॅब प्रतिनिधी राजू मिस्कीन यांनी  प्रकाश टाकला


लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: तालुक्यातील मिस्कीनवाडी येथे जागतिक अंध दिनाच्या  पृष्ठभूमीवर आठवडाभर आयोजित विविध सामाजिक उ पक्रमाचा शुक्रवारी समारोप झाला.
अंधदिनी लू ब्रेल यांच्या जीवनपटावर नॅब जिल्हाध्यक्ष डॉ.  यशवंत चवरे बुलडाणा व नॅब प्रतिनिधी राजू मिस्कीन यांनी  प्रकाश टाकला. १६ ऑक्टोबर रोजी अंध मुलासोबत डोळस  मुलांच्या सामूहिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले.  शुक्रवारी मेहकरचे तहसीलदार संतोष काकडे यांनी क्रीडा स् पर्धेमधील विजयी खेळाडूंना आणि उपस्थितांना डोळस व अंध  मुलामध्ये भावनिक आपुलकीचे नाते कसे जपावे यावर  मार्गदर्शन केले. 
यावेळी संतोष काकडे, पं.स. गटशिक्षण अधिकारी पागोरे,  श्रीकृष्ण काकडे, मंडळ अधिकारी अनमोड, केंद्रप्रमुख  वानखेडे, मुख्याध्यापक अशोक दिवटे, साठे, अंभोरे यांचा स त्कार करण्यात आला. १८ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सां प्रदायिक गायन भजनकर्त्या साधना दिलीप इंगळे व त्यांचे  सहकारी प्रभा मिस्कीन, विमल वाघ, लिला बोडखे, पमा  पाटोळे, चंद्रभागा मिस्कीन, आश्राबाई जाधव, रेखा शिंदे, कुसुम  वाघ यांनी भजन म्हणण्यासाठी सहकार्य केले. 
या दिनाचे आयोजन राजू मिस्कीन यांनी केले. तर नियोजन  वसुदेव मिस्कीन, विशाल सपकाळ, उत्तम पाटोळे, नंदकिशोर  गोवर्धन, शेषराव मिस्कीन, दत्ता मिस्कीन, रवी मिस्कीन, विनोद  पाटोळे, शरद वानखेडे, गणेश राऊत, पुरुषोत्तम देवकर, दत्ता  कव्हर, किरण मिस्कीन, अमोल पाटोळे, श्याम तुपकर, राम तु पकर, विठ्ठल मिस्कीन, गणेश मिस्कीन यांनी केले.  मिस्कीनवाडी व परिसरातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: The social enterprise concludes in Miskanewadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.