सोशल मीडिया आचारसंहितेच्या कचाट्यात!

By admin | Published: October 24, 2016 02:47 AM2016-10-24T02:47:42+5:302016-10-24T02:47:42+5:30

नगरपालिका निवडणुकीदरम्यान सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचारासाठी आता घ्यावी लागते सायबर टिमकडून परवानगी.

Social media code of conduct! | सोशल मीडिया आचारसंहितेच्या कचाट्यात!

सोशल मीडिया आचारसंहितेच्या कचाट्यात!

Next

मनोज पाटील
मलकापूर, दि. २३-नगरपालिका निवडणूकदरम्यान उमेदवार व त्यांच्या सर्मथकांना फेसबुक अथवा व्हॉट्स अँपद्वारे प्रचार करण्याकरिता जिल्हास्तरीय सायबर टीमकडून मंजुरी घ्यावी लागणार आहे.
नगर परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. ही आचारसंहिता सोशल मीडियालाही लागू राहणार असून, निवडणूक विभागाचा सोशल मीडियावर ह्यवॉचह्ण राहणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या उमेदवाराच्या विरोधात अथवा सर्मथनार्थ मजकूर टाकल्यास त्याबाबत तक्रार झाल्यास अथवा आचारसंहिता पथकाला याबाबत शंका आल्यास मजकुराची परवानगी घेतली का? याची खात्री केली जाणार आहे. विनापरवानगी मजकूर प्रसिद्ध झाला असेल, तर त्यावर कारवाई केली जाणार आहे. अशाप्रकारे सोशल मीडियावर आचारसंहितेचा बडगा उगारण्यात आल्याने उमेदवार व त्यांच्या सर्मथकांना सावधतेची भूमिका वठवावी लागणार आहे.
राज्यभरात नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजवून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूकदरम्यान प्रचारासाठी विविध प्रकारच्या जाहिरात, वृत्तपत्रे डिजिटल फलक व इतर छोट्या-मोठय़ा साधनासाठी आचारसंहितेची नियमावली लागू केली जात होती. तर आता नव्यानेच सोशल मीडिया ही या प्रचार यंत्रणेचा एक घटक झाल्याने त्यावरही निवडणूक आयोगाकडून निर्बंंध लावण्यात आले आहेत. फेसबुक, व्हॉट्स अँप यासह अन्य कोणत्याही सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवारांच्या जाहिराती अथवा इतर मजकूर प्रसिद्ध करताना परवानगी घ्यावी लागणार आहे. विना परवानगी अशाप्रकारे काही बाबी प्रसिद्ध झाल्या, तर आचारसंहिता भंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
सध्या तरुणाईमध्ये सर्वाधिक मोठय़ा प्रमाणात व्हॉट्स अँप व फेसबुक हा सोशल मीडिया वापरला जात असून, व्हॉट्स अँपचे तर अनेक ग्रुप तयार करून त्याद्वारे आपा पल्या प्रभागातील उमेदवारांचे कौतुक करण्याबरोबरच त्यांना निवडून देण्याचे आवाहनही केले जाण्याची शक्यता असते. याशिवाय फेसबुकवरूनही अशाच प्रकारे प्रचाराची यंत्रणा राबविली जाईल.
निवडणुकीचा ज्वर चढला असल्याने आतापासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराची यंत्रणा राबविणे सुरू झाले आहे. या प्रचार यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन केले आहे. त्यानुसार या सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर सेलच्या परवानगीशिवाय उमेदवाराच्या सर्मथनातील अथवा विरोधातील एखादी पोस्ट प्रसिद्ध केल्यास अशांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

उमेदवारांनाही भोगावे लागणार परिणाम
सर्वत्र नगरपालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान होत असून, दरम्यान एकमेकांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांचे सर्मथन व विरोध हा सोशल मीडियावरुन अधिक प्रमाणात सुरु होईल. काही उमेदवारांचे अकाउंट जरी त्यांचे असले, तरी त्याची हातळणी बरेचदा त्यांचे सर्मथकच करतील. या सर्मथकांकडून एखादी चुकीची गोष्ट घडल्यास त्याचे परिणाम उमेदवारांना भोगावे लागणार असल्याने उमेदवारांनाही आता काळजी घ्यावी लागणार आहे.

Web Title: Social media code of conduct!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.