समाज भक्ती संप्रदायाकडे वळला- डहाकेवसंतराव डहाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:20 AM2017-10-12T00:20:55+5:302017-10-12T00:21:04+5:30

बुलडाणा : संतांनी संस्कृत भाषेऐवजी प्रादेशिक भाषेतूनच संत साहित्याची निर्मिती केली. यामुळे सर्व समाजाला संताची भाषा समजून समाज भक्ती संप्रदायाकडे वळला, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा मराठी साहित्य संमेलनाचे माझी अध्यक्ष वसंतराव डहाके यांनी केले.

Society turned towards devotional society - Dahakevasantra Dahake | समाज भक्ती संप्रदायाकडे वळला- डहाकेवसंतराव डहाके

समाज भक्ती संप्रदायाकडे वळला- डहाकेवसंतराव डहाके

Next
ठळक मुद्देमॉडेल डिग्री कॉलेजमध्ये रंगले संत साहित्यावर चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : संतांनी संस्कृत भाषेऐवजी प्रादेशिक भाषेतूनच संत साहित्याची निर्मिती केली. यामुळे सर्व समाजाला संताची भाषा समजून समाज भक्ती संप्रदायाकडे वळला, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा मराठी साहित्य संमेलनाचे माझी अध्यक्ष वसंतराव डहाके यांनी केले.
बुलडाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेज येथे आयोजित भक्ती संप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव, या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून डॉ.सदानंद देशमुख, प्राचार्य डी.एम.अंभोरे, प्राचार्य नीळकंठ भुसारी, प्राचार्य राजाभाऊ हावरे, प्रा.प्रभाकर वारे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात वसंतराव डहाके  म्हणाले की, संतांचा मराठी साहित्यावर अंतरंगी आणि बाहय़रंगी प्रभाव आहे. यामुळेच संतांची ३00 वर्षांची परंपरा आजही टिकून आहे आणि पुढेही ही परंपरा टिकून राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेले प्रा.सदानंद देशमुख आपल्या भाषणात म्हणाले भक्तीसंप्रदायाचा मराठी साहित्यावर प्रभाव, या गोष्टीचा विचार करताना लक्षात येते. आधीच्या बंदिस्त वेदकालीन संस्कृतीत सामान्य माणसांना लिहिण्या, वाचण्याची भक्तीची वाट मोकळी नव्हती. ज्ञानेश्‍वरांनी हा आत्मविश्‍वास पहिल्यांदा निर्माण केला. त्याचप्रमाणे महानुभाव वाड्मयाने सर्व जाती, धर्मातील स्त्री -पुरुषांना भक्तीच्या माध्यमातून लिहिण्या, वाचण्याचा अभिव्यक्त होण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे नंतर काळात मराठी साहित्यामध्ये कृषी साहित्य आणि विद्रोही साहित्य निर्माण झाले. परंपरेतील भालचंद्र नेमाडे, महांतरे यासारख्या लेखकांनी असले अनुभव आणि निष्ठा यांच्याशी प्रामाणिक राहून केले. 
 संत साहित्यातील वेदक अभिव्यक्तीमुळे दलित, पददलित समाजातील लेखक, कवींना विद्रोहाची वाट सापडली आणि नंतरच्या काळात प्रभावी साहित्य निर्मिती होत गेली. या चर्चासत्राचे प्रास्ताविक प्राचार्य गोविंद गायकी यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी मराठी साहित्याची गंगोत्री ही बुलडाणा जिल्हय़ातून झाली आहे. संत चोखामेळा, चक्रधर स्वामी, महदंबा या संतांची या जिल्हय़ाला मोठी परंपरा लाभली आहे. हीच परंपरा आजही टिकून असल्याचे गायकी यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनंत सिरसाट यांनी केले. तर आभार प्रा.विनकर यांनी मानले.

Web Title: Society turned towards devotional society - Dahakevasantra Dahake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.