‘मृदा आरोग्य’ मुळे जमिनीची पोत सुधारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 02:22 PM2020-02-19T14:22:46+5:302020-02-19T14:22:52+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील शेत जमीनीमध्ये लोहाचे प्रमाण कमी आहे तर जस्त, तांबे, बोरान, सल्फरचे प्रमाण मध्यम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: गेल्या पाच वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील शेत जमिनींचा पोत सुधारण्यास मदत मिळत असून दोन लाख माती नमुन्यांची पाच वर्षात तपासणी करण्यात आली आहे.
देशात २०१५ मध्ये १९ फेब्रवारी पासून मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. राजस्थानमधून त्यास प्रारंभ झाला होता. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील एकंदर स्थितीची माहिती घेतली असता उपरोक्त बाब समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातील शेत जमीनीमध्ये लोहाचे प्रमाण कमी आहे तर जस्त, तांबे, बोरान, सल्फरचे प्रमाण मध्यम आहे. त्यामुळे जमिनीतील सुक्ष्म मुलदव्याचे प्रमाण योग्य पातळीवर आणण्यासाठी ही मोहिम उपयुक्त ठरत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या वर्षी तालुका निहाय एक गाव निवडून तेथील जमिनीच्या पोताची अर्थात मातीच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. त्याचे सकारात्मक परिणामही समोर येत आहे. वैयक्तिक स्तरावर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत असल्याचे अनुभव आहे. परिणामी या मोहिमेची आता व्यापकात वाढविण्यात आल्यास जिल्ह्याचा उत्पादकता निर्देशांकही वाढण्यास मदत होऊ शकते, असा प्रशासनाचा कयास आहे.
मुद्रा तपासमी ही प्रामुख्याने बागायती क्षेत्रासाथी अडीच हेक्टरला एक नमुना तर कोरडवाहू शेतीसाठी दहा हेक्टरला एक नमुना या प्रमाणे तपासण्यात येते. दरम्यान, यंदा आता तालुका निहाय किमान पाच गावे माती नमुन्यांच्या तपासणीसाठी घेण्यात येत आहे. आगामी पाच वर्षात त्याची व्याप्ती वाढून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेत जमीन नमुन्याची तपासणी होऊन क्रॉप पॅटर्न ठरविण्यास जमिनीचे आरोग्य सुधारण्यात मदत मिळू शकते, असा कयास आहे.
रासायनिक खतांचा वापर घटतोय
जमीनीच्या पोताची माहीती मिळत असल्याने रासायनिक खतांचा वापर कमी होत असल्याचे चित्र आहे. सेंद्रीय शेतीबाबत झालेली जागरूखता, बदलता क्रॉप पॅटर्न आणि यंदा झालेला जादा पाऊस यामुळेही रासायनिक खतांचा वापर कमी होत असल्याची निरीक्षणे आहेत. दरम्यान बुलडाणा तालुक्यातील प्रकाश केशव सुरडकर या शेतकºयाने मुदा आरोग्य पत्रिकेचा वापर करत सोयाबीनचे उत्पन्न घेतले. त्याच्या उत्पन्नामध्ये तुलनेने वाढ झाली असून खतांचीही बचत झाल्याचा त्यांचा अनुभव आहे.