अज्ञात वाहनाच्या धडकेत जवान ठार, भानापूरजवळचा प्रकार

By संदीप वानखेडे | Published: May 18, 2023 12:13 AM2023-05-18T00:13:51+5:302023-05-18T00:14:04+5:30

विकास शालीग्राम गायकवाड असे जवानाचे नाव आहे.

Soldier killed in collision with unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत जवान ठार, भानापूरजवळचा प्रकार

अज्ञात वाहनाच्या धडकेत जवान ठार, भानापूरजवळचा प्रकार

googlenewsNext

संदीप वानखडे, सुलतानपूर (बुलढाणा): भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत सीमा सुरक्षा दलाचा जवान जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना लाेणार तालुक्यातील भानापूरजवळ १७ मे राेजी रात्री ९.३० वाजता घडली. विकास शालीग्राम गायकवाड रा. येसापूर असे मृतक जवानाचे नाव आहे. सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले विकास गायकवाड व किशाेर शंकर धांडे हे दुचाकी क्र. एमएच २८-२४५७ ने सुलतापूर येथून येसापूर गावाकडे जात हाेते. दरम्यान, रात्री ९.३० च्या दरम्यान नागपूर औरंगाबाद राज्य महामार्गावर भानापूर जवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये विकास गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला तर किशाेर धांडे हे जखमी झाले.गायवाकड यांच्या पार्थीवावर १८ मे राेजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Web Title: Soldier killed in collision with unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात