सैनिकांना रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच !

By admin | Published: August 26, 2015 12:34 AM2015-08-26T00:34:04+5:302015-08-26T00:34:04+5:30

वन रँक वन पेन्शन; सैनिकांचा सन्मान ठेवण्यासाठी ही मागणी मान्यच व्हावी.

The soldiers have to face the road unfortunately! | सैनिकांना रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच !

सैनिकांना रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच !

Next

बुलडाणा : सैनिकांचे काम देशसेवा आहे. जोपर्यंंत तो सैन्यात असतो तोपर्यंंत त्याच्या घरादाराचा विचारही त्याच्या मनात शिवत नाही. आयुष्यातील उमेदीची वर्ष तो सैन्यात घालवितो व ज्यावेळी सैन्यातून नवृत्त होतो त्यावेळी त्याचे मुलेही कमावती झालेली नसतात. अशा वेळी त्याला मिळणारी पेन्शन हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे; मात्र वाढती महागाई व तो देत असलेली सेवा याचा ताळमेळ पेन्शनमध्ये बसत नाही. आधी नवृत्त झालेल्या सैनिकांवर पेन्शनच्या बाबतीत खूप मोठा अन्याय झाला असल्याने वन रँक वन पेन्शन हाच एकमेव मार्ग आहे. जे सैनिक देशासाठी बलिदानास तयार होतात त्याच सैनिकांना पेन्शनसाठी रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच असल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली. लोकमत जिल्हा कार्यालयात मंगळवारी आयोजित परिचर्चेत या संदर्भात अतिशय भावनिक मुद्दे उपस्थित करण्यात आले. चर्चेची सुरुवात करताना सुभेदार मेजर के.डी.जाधव यांनी तीन युद्धात सहभाग घेतलेला एक सैनिक सध्या मोळय़ा विकण्याचे काम करतो, ही व्यथा सांगितली. तो सैनिक नवृत्त झाल्यानंतर त्याला मिळणारी पेन्शन व आज नवृत्त झालेल्या त्याच्याच दर्जाच्या सैनिकाला मिळणारी पेन्शन यामध्ये खूप अंतर असल्याने एकाला मोळय़ा विकाव्या लागतात, हे स्पष्ट करून वन रँक वन पेन्शनचा मुद्दा प्रकर्षाने पटवून दिला. कप्टन अशोक राऊत यांनी विविध देशातील सैनिकांच्या पेन्शनचे त्यांना मिळणार्‍या सन्मान व नवृत्तीनंतरच्या सुख-सोयीची उदाहरणे देत वन रँक वन पेन्शनचे महत्त्व स्पष्ट केले. एखादा सैनिक शवपेटीत आला तर त्याच्या सन्मानासाठी सर्व गाव गोळा होते. सर्व अधिकारी, नेते मानवंदना देण्यासाठी येतात; पण तोच सैनिक दररोज जीवनाशी संघर्ष करीत मरणयातना सोसतो त्याच्यासाठी समाजाने एकत्र आले पाहिजे. ते होताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त केली. सेवानवृत्त हवालदार विनायक माधवराव अनाळकर यांनी सुभेदार मोतीराम चिंचोले यांनीही विविध प्रसंग सांगून पेन्शनर सैनिकांच्या व्यथा विषद केल्या. सैनिकीसेवेतून नवृत्त झाल्यानंतर सैनिकांना मिळणार्‍या नोकर्‍या या गार्ड सदृश सेवेच्याच असतात. त्यांचा कोणी सन्मानही ठेवत नाही. शौर्यचक्रही विजेता गार्ड झाल्यावर त्याच्याशी वागणूकही नोकराप्रमाणे असते, अशा सैनिकांचा आत्मसन्मान जपण्यासाठी वन रँक वन पेन्शन मिळाले तर सैनिकांचे जीवनमान व कुटुंबाचे राहणीमान उंचावेल, हालाखीच्या परिस्थितीत त्यांना जगावे लागणार नाही, अशी भावना व्यक्त झाली.

Web Title: The soldiers have to face the road unfortunately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.