सर्वसामान्य तथा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:20 AM2021-07-24T04:20:52+5:302021-07-24T04:20:52+5:30
देऊळगाव राजा : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. ते ...
देऊळगाव राजा : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे, असे निर्देश पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले. ते तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथे आयाेजित बैठकीत बाेलत हाेते.
पालकमंत्री डॉ़ राजेंद्र शिंगणे यांनी तालुक्यातील सर्व विभागाची आढावा बैठक घेतली़ अद्यापपर्यंत ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध झालेले नाही त्यांना तातडीने शून्य व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले़ बैठकीत राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतील मंजूर लाभार्थ्यांना ३ लाख रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले़ या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी दळवी, तहसीलदार सारिका भगत, कृषी अधिकारी, मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासह महसूल विभाग, सिंचन विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, नगरपरिषद, कृषी विभाग, पंचायत समिती, महावितरण अशा तालुक्यातील विविध विभागातील अधिकारी उपस्थित हाेते.