वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:21 AM2021-07-05T04:21:47+5:302021-07-05T04:21:47+5:30

राहेरी बु. : आडगाव राजा गावातील विद्युत तारा जीर्ण झाल्यामुळे तुटत आहेत़ त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत ...

Solve power supply problems | वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लावा

वीजपुरवठ्याची समस्या मार्गी लावा

Next

राहेरी बु. : आडगाव राजा गावातील विद्युत तारा जीर्ण झाल्यामुळे तुटत आहेत़ त्यामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे़ तसेच जीर्ण तारांमुळे अपघाताची शक्यता आहे़ जीर्ण तारा बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना व परिवहन सेना आदींनी केली आहे़ मागणी मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयास कुलूप ठाेकण्याचा इशारा देण्यात आला आहे़

आडगाव राजा परिसरात गत काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत आहे़ जीर्ण झालेल्या विद्युत तारांमुळे विजेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत़ वीजपुरवठा बंद असल्याने गावातील पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गावातील विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे बालकांना व वयोवृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन या समस्या सोडवाव्या. याअगोदरही वेळावेळी जीर्ण झालेला तारांकरिता महावितरणला कळविण्यात आलेले आहे़ मात्र, कारवाई करण्यात आलेली नाही़ या परिसरात विजेच्या नवीन तारा टाकून ही समस्या साेडवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना आणि परिवहन सेना यांच्या वतीने करण्यात आली आहे़ अन्यथा महावितरण कार्यालयाला कुलूप ठाेकू, असा इशारा निवेदनात दिला आहे.

या वेळी मनविसे जिल्हाध्यक्ष शिवादादा पुरंदरे, मनसे तालुकाध्यक्ष नीलेश देवर, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष अतिश राजे जाधव, मनसे परिवहन सेनेचे महेंद्र पवार, मनविसे तालुकाध्यक्ष अंकुश चव्हाण, घनश्याम केळकर, अभिजित देशमुख, अनिल राजे जाधव, भागवत राजे जाधव आदी उपस्थित होते.

Web Title: Solve power supply problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.