मिसाबंदींचा प्रश्न सोडवा - बागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 12:20 AM2017-09-04T00:20:10+5:302017-09-04T00:23:55+5:30

जळगाव जामोद: आणीबाणीच्या काळातील मिसाबंदींना  सोसाव्या लागणार्‍या हालअपेष्टा व कुटुंबांची झालेली वा ताहत या पृष्ठभूमीवर त्यांना स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचा दर्जा  मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन चर्चा  करावी आणि त्यांना मानधनासह सन्मानपत्र देण्यासाठी  शासकीय स्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी भावना  विधानसभेचे अध्यक्ष ना. हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त  केली. तर मिसाबंदीचा एक प्रतिनिधी म्हणून हा प्रश्न  निकाली काढण्यासाठी शासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न  केले जातील, असे सांगून मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राचे शासन  मिसाबंदींना सन्मानपत्र व सवलती मिळाव्या यासाठी  सकारात्मक असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री ना. भाऊसाहेब  फुंडकर यांनी केले.

Solving the Problems | मिसाबंदींचा प्रश्न सोडवा - बागडे

मिसाबंदींचा प्रश्न सोडवा - बागडे

Next
ठळक मुद्देशासन सकारात्मक - भाऊसाहेब फुंडकर अ.भा. लोकतंत्र सेनानी संघाचा जिल्हा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: आणीबाणीच्या काळातील मिसाबंदींना  सोसाव्या लागणार्‍या हालअपेष्टा व कुटुंबांची झालेली वा ताहत या पृष्ठभूमीवर त्यांना स्वातंत्र्यसंग्राम सैनिकांचा दर्जा  मिळण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन चर्चा  करावी आणि त्यांना मानधनासह सन्मानपत्र देण्यासाठी  शासकीय स्तरावर प्रयत्न व्हावेत, अशी भावना  विधानसभेचे अध्यक्ष ना. हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त  केली. तर मिसाबंदीचा एक प्रतिनिधी म्हणून हा प्रश्न  निकाली काढण्यासाठी शासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न  केले जातील, असे सांगून मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राचे शासन  मिसाबंदींना सन्मानपत्र व सवलती मिळाव्या यासाठी  सकारात्मक असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री ना. भाऊसाहेब  फुंडकर यांनी केले.
ते रविवार ३ सप्टेंबर रोजी जळगाव जामोद येथे आयोजित  अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाच्या बुलडाणा  जिल्हा मेळाव्यात बोलत होते. श्री जलाराम बाप्पा मंदिर  सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपा प्रदेश महामंत्री  आ.डॉ. संजय कुटे, प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती,  युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आ. आकाश फुंडकर, लोकतंत्र  सेनानी संघाचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश पांडे, माजी  आमदार रामभाऊ गावंडे, नगराध्यक्ष सीमा डोबे, राजबंदी  बाजीराव बापू डाळीमकर, विदर्भप्रमुख गारोळे, सुरेशआप्पा  खबुतरे, समिती प्रमुख ओंकारदास राठी व जिल्हाध्यक्ष  रामदास कारोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
भारतमाता व जयप्रकाश नारायण यांच्या प्रतिमा पूजनाने व  दीप प्रज्वलनाने मेळाव्याला सुरुवात झाली. मान्यवरांच्या  स्वागतानंतर अखिल भारतीय लोकतंत्र सेनानी संघाची  भूमिका व लढा राष्ट्रप्रहरींचा या पुस्तक निर्माणाची  संकल्पना लेखक, संपादक रामदास कारोडे यांनी  प्रास् ताविकात व्यक्त केली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ‘लढा  राष्ट्रप्रहरींचा’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. 
उद्घाटक ना. हरिभाऊ बागडे यांनी आणीबाणी काळातील  संघर्षाचा इतिहास विशद केला. तर या काळात बुलडाणा  जिल्हय़ातील मिसाबंदींची कामगिरी ही अत्यंत उत्कृष्ट  राहिल्याचे सांगितले. अनेकांचा नावानिशी त्यांना उल्लेख  केला. अध्यक्षीय भाषणात ना. फुंडकरांनी आणीबाणी  काळातील जेलमधील प्रत्यक्ष अनुभव कथन केले. तांत्रिक  बाबींची पूर्तता होताच मिसाबंदींना मानधन व अन्य सवल ती दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी आ. डॉ. संजय कुटे, आ. चैनसुख संचेती, आ.  आकाश फुंडकर यांनी मिसाबंदींच्या मागणीला दुजोरा देत  हा प्रश्न मुख्यमंत्र्याकडे लावून धरल्या जाईल, असे सांगि तले. तर लोकतंत्र सेनानी संघाचे प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश  पांडे यांनी मिसाबंदींना अशा प्रकारची मागणी करण्याची  वेळ यावी हेच अनुचित असल्याचे सांगितले. मिसाबंदींच्या  प्रश्नावर त्वरित कार्यवाही करण्याची विनंतीही त्यांनी  मान्यवरांना केली. उदय जोशी यांनी ‘हम करे राष्ट्र  आराधना’ हे गीत सादर केले. तर पत्रकार प्रा. नानासाहेब  कांडलकर यांनी संचालन केले. भाजपा युवा मोर्चा  जिल्हाध्यक्ष सचिनबापू देशमुख यांनी आभार मानले.  राष्ट्रगीताने समारंभाची सांगता झाली.  
या कार्यक्रमासाठी ओंकारदास राठी, रामदास कारोडे, प्रा.  नानासाहेब कांडलकर, नरेंद्रबापू देशमुख, कैलास डोबे,  प्रा. राजेश गोटेचा, अनुप पुराणिक, संजय पांडव, अजय  गिरजापुरे, राम सिंधीकर, माजी नगराध्यक्ष रामदास  बोंबटकार, शंकरराव ताडे, नीलेश शर्मा, सचिन देशमुख  या समिती सदस्यांनी परिश्रम घेतले.       

जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
या मेळाव्याला बुलडाणा जिल्हय़ासह संपूर्ण महाराष्ट्रातील  मिसाबंदींची उपस्थिती होती. अनेकांच्या तरुण वयात  झालेल्या जेलमधील भेटीनंतर आता आयुष्याच्या  संध्याकाळीच त्यांना एकमेकांना या मेळाव्याच्या निमित्ताने  भेटता आले. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा तर  मिळालाच शिवाय अनेकांना आपले अश्रूही आवरता आले  नाही. काही दिवंगत मिसाबंदीच्या धर्मपत्नीची व  कुटुंबीयांची यावेळी असलेली उपस्थिती भावुक बनली.  दिवंगत मिसाबंदींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

Web Title: Solving the Problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.