भाजपच्या काही विद्यमान आमदारांनाही डच्चू मिळण्याची शक्यता

By admin | Published: September 6, 2014 01:10 AM2014-09-06T01:10:22+5:302014-09-06T01:10:22+5:30

‘चाणक्य’ची स्पष्ट शिफारस, अहवाल भाजपच्या कोअर कमिटीकडे !

Some of the BJP's current MLAs are likely to get a drop | भाजपच्या काही विद्यमान आमदारांनाही डच्चू मिळण्याची शक्यता

भाजपच्या काही विद्यमान आमदारांनाही डच्चू मिळण्याची शक्यता

Next

अनिल गवई / खामगाव
विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमिवर भाजपने चाणक्य नामक संस्थेमार्फत केलेल्या सर्व्हेक्षणाचा अहवाल पक्षाच्या कोअर कमेटीकडे सादर झाला आहे. या संस्थेने दोन टप्प्यात इच्छुक उमेदवारांची गुप्त चाचपणी केली असून, त्यानुसार काही विद्यमान आमदारांनाही डच्चू देण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली.
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करताना देशपातळीवर एक गुप्त सर्व्हेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणाची जबाबदारी दिल्ली येथील चाणक्य नामक संस्थेला देण्यात आली. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत याच संस्थेला उमेदवारांच्या चाचपणीसाठी कंत्राट देण्यात आला असून, महाराष्ट्रातील सर्व, २८८ मतदारसंघांमध्ये चाणक्यने सर्व्हेक्षण केले. यासाठी गेल्या महिनाभरापासून चाणक्यची ४१ सदस्यांची चमू महाराष्ट्र पालथा घालत आहे. या संस्थेने मुंबईतून सर्व्हेक्षणाला सुरूवात केली. पश्‍चिम महाराष्ट्रानंतर मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम विदर्भ आणि खान्देश विभागात चाणक्यच्या चमुने विविध पातळीवर माहिती गोळा केली. विदर्भातील ६२ मतदार संघांचे दुसर्‍या टप्प्यातील सर्व्हेक्षण दोन दिवसांपूर्वी संपले.
चाणक्यच्या वरिष्ठांनी संपूर्ण राज्याचा सर्व्हेक्षण अहवाल भाजपच्या कोअर कमिटीकडे सादर केला. अतिशय गोपनिय पध्दतीने राबविण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणात काही संभाव्य उमेदवारांसोबतच, विद्यमान आमदारांबाबतही गंभीर आक्षेप नोंदविण्यात आल्याची माहिती आहे.

** काही विद्यमान आमदारांना डच्चू!
सन २00९ च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला विदर्भात केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले. त्यापैकी यवतमाळ, अमरावतीसारख्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपची अवस्था अतिशय बिकट आहे. विदर्भातील बहुतांश विद्यमान आमदारांनी आपल्या मतदारसंघात कुठलिही विकास कामे केली नाहीत. जनसंपर्काच्या बाबतीतही हे आमदार कमकुवत असल्याचे चाणक्यच्या सर्व्हेक्षणात समोर आले आहे. त्यामुळे अशा आमदारांना पुन्हा संधी नको, असे रोखठोक मत चाणक्यच्या अहवालात नमुद केले असल्याचे समजते.

** राखीव मतदारसंघातील उमेदवारांना पुन्हा संधी नाही
विदर्भातील ६२ विधानसभा मतदारसंघांपैकी अनुसूचित जातीसाठी ९ तर अनुसूचित जमातीसाठी ७ मतदारसंघ राखीव आहेत. या मतदारसंघांमध्ये नवीन चेहर्‍याला संधी देण्याची रणनिती भाजपची असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोला, वाशिम, गोंदीया, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील राखीव विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

** अहवालाबाबत गोपनियता
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील विधानसभा मतदार संघात चाणक्यने केलेल्या दुसर्‍या सर्व्हेक्षणाचा अहवाल भाजपच्या कोअर कमिटीकडे सादर करण्यात आला आहे. या अहवालाबाबत अतिशय गुप्तता पाळली जात असून, तो संसदीय कार्य समितीसमोरही अद्यापपर्यंंत सादर करण्यात आला नाही. दरम्यान, चाणक्यचा अहवाल संसदीय कार्य समितीसमोर सादर करण्याची कोणतीही तरतूद नाही. परंतु, विधानसभा निवडणुकीत पक्षाला लाभ मिळावा, यासाठी काही फेरबदल केले जाणार असल्याची माहिती काही भाजप नेत्यांनी स्वत:चे नाव न सांगण्याच्या अटीवर लोकमतला दिली.

** विधानसभेत लोकसभेचाच फॉर्म्यूला
लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशसारख्या राज्यात भाजपने चाणक्यच्या सर्वेक्षणानुसारच उमेदवार उभे केले. चाणक्यने सुचविलेल्या संभाव्य उमेदवारांनाच लोकसभेत संधी देण्यात आली. त्यामुळे उत्तरप्रदेशात भाजपच्या जागा वाढल्या. आता हाच फॉर्म्यूला विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कामी पडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: Some of the BJP's current MLAs are likely to get a drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.