काही खोके शेतकऱ्यांना द्यायला हवे होते, ठाकरेंनी काढला चिमटा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 12:31 PM2022-11-27T12:31:48+5:302022-11-27T12:32:09+5:30
प्रत्येक वक्त्याने खाेक्यांचा उल्लेख केला. त्यावर ठाकरे यांनी हा चिमटा काढला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिखली (जि. बुलढाणा) : पाेळ्याला बैलांना सजवतानाही त्यावर ‘५० खाेके सगळेच ओके’ असे लिहिलेले हाेते. त्या खाेक्यांपैकी काही खाेके शेतकऱ्यांना दिले असते तर त्यांची प्रगती झाली असती, असा टाेला शिवसेनापक्षप्रमुखउद्धव ठाकरे यांनी येथे शेतकरी मेळाव्यात शनिवारी लगावला.
‘५० खाेके, एकदम ओके’ने ही सभा गाजली. जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी खाेक्याच्या घाेषणेने सुरुवात केली. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक वक्त्याने खाेक्यांचा उल्लेख केला. त्यावर ठाकरे यांनी हा चिमटा काढला.
आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला. तुम्ही विराेधात असताना मध्य प्रदेशने शेतकऱ्यांना वीजबिल माफी दिल्याचे सांगत महाराष्ट्रात हा निर्णय लागू करण्याची मागणी केली हाेती. आता तुम्ही सत्तेत आहात, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीजबिले माफ करून त्यांना दिलासा देण्याची हिंमत दाखवा, असे आव्हान ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले. यावेळी खासदार संजय राऊत, विनायक राऊत, नीलम गाेऱ्हे, अंबादास दानवे आदी उपस्थित हाेते.