कधी स्टेअरींग जाम, तर कधी चाक निखळते; भंगार बस धावतात रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 03:44 PM2019-11-18T15:44:56+5:302019-11-18T15:45:11+5:30

हा कुठला सुरक्षित प्रवास? असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.

Sometimes the steering jam, and sometimes the wheel breaks; Wreck buses run on the streets | कधी स्टेअरींग जाम, तर कधी चाक निखळते; भंगार बस धावतात रस्त्यावर

कधी स्टेअरींग जाम, तर कधी चाक निखळते; भंगार बस धावतात रस्त्यावर

Next

- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील सातही आगारातील बहुतांश एसटी बस नादुरूस्त आहेत. कधी स्टेअरींग जाम, तर कधी चाक निखळण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ‘एसटीचा प्रवास, सुखी प्रवास’ असा सर्वसामान्यांचा असलेला समज आता खोटा ठरत आहे. याउलट हा कुठला सुरक्षित प्रवास? असे म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सातही आगारांमधून दररोज ४५० शेड्यूल असते. या सर्व बसेसची आठवड्याला, महिन्याला व दर तीन महिन्यातून सर्व्हीसींग करणे गरजेचे असते. गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी हातणी गावाजवळ चिखली-बुलडाणा या धावत्या बसचे चाक निखळल्याची घटना घडली. बसच्या वेगावर नियंत्रण मिळविण्यात चालकाला यश आल्याने सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही. ही घटना ताजी असतानाच १६ नोव्हेंबर रोजी बुलडाणा शहरातील क्षय आरोग्य धामनजीकच्या वळणावर बुलडाणा-अजिंठा बसचे स्टेअरींग जाम झाल्याने बस रस्त्याच्या खाली उतरली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला असून चालक, वाहक व प्रवासी सुखरूप आहेत.

फिटनेस सर्टीफिकेटवरही प्रश्नचिन्ह
बस नादुरूस्त असताना या बसेसना रस्त्यावर धावण्यासाठी फिटनेस सर्टीफिकेट देणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कर्तव्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. भंगार गाड्यांकडे अशाप्रकारे दुर्लक्ष करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रकार सध्या वाढत आहे. अपघातांच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नादुरूस्त बसवर तसे शिक्कामोर्तब करणे कटाक्षाने पाळले पाहिजे. उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी बसची तपासणी करताना नादुरूस्त बसला फिटनेस सर्टीफिकेट नाकारल्यास असे प्रकार नियंत्रणात आणण्यात एसटी महामंडळाला काही प्रमाणात का होईना पण यश येईल.


बसचे चाक निखळणे व स्टेअरींग जाम होणे, अशा घटना नेहमी घडत नाहीत. एसटी बसच्या चाकाचा एक्सल तीन ते चार सेंटीमीटर जाडीचा असतो. हा एक्सल तुटल्यास चाक निघाल्याचा प्रकार घडतो. तर एसटी बसच्या स्टेअरींगमध्ये आॅईल टँक असते. या आॅईल टँकमध्ये धूळ साचल्यास स्टेअरींग जाम होते. सर्व्हीसींगला विलंब झाल्यास देखील बसचे स्टेअरींग जाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण शक्यतोपर सर्व बसेसची नियमितपणे सर्व्हीसींग करण्यात येते.
- संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा.

Web Title: Sometimes the steering jam, and sometimes the wheel breaks; Wreck buses run on the streets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.