सोनोशी आरोग्य सेवा केंद्राची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 08:29 PM2017-08-10T20:29:16+5:302017-08-10T20:29:16+5:30
सोनोशी : नागरिकांच्या आरोग्याबाबत महत्वाची मानली जाणारी आरोग्य सेवाच आजारी पडली आहे. आरोग्य सेवा केंद्राची इमारत एक वर्षापासून कुलूप बंद असून लसीकरणाच्या दिवशीच हे केंद्र उघडते. नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सोनोशी : नागरिकांच्या आरोग्याबाबत महत्वाची मानली जाणारी आरोग्य सेवाच आजारी पडली आहे. आरोग्य सेवा केंद्राची इमारत एक वर्षापासून कुलूप बंद असून लसीकरणाच्या दिवशीच हे केंद्र उघडते. नागरिकांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहे.
सोनोशी या पाच हजार लोकसंख्या असलेल्या गावात प्राथिमक आरोग्य केंद्र आहे. त्याठिकाणी आरोग्य सेविकेची कायम स्वरुपी नेमणूक असून सुद्धा या इमारतीत अजूनही एकही दिवस आरोग्यसेविका वास्तव्यास राहिली नाही. लाखो रुपये खर्च करुनही इमारत ओस पडली असून, इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीच्या काचा फुटल्या आहे. संडास, बाथरुमची अवस्था बिकट आहे. पाईप फुटले आहेत. तर इमारतीला गेट असून, ते मोडलेले आहे. त्यामुळे याठिकाणी मोकाट जनावरांचे वास्तव्य असते. या इमारतीच्या देखभालीसाठी वर्षाकाठी निधी येतो, मात्र एक रुपयाही या इमारतीवर खर्च केला गेला नाही. येथे लाईटची व्यवस्था नाही. डिलेव्हरी रुम आहे, मात्र घरी व खाजगी दवाखान्यात होणाºया डिलेव्हरी ह्या आरोग्य केंद्रात झाल्याचे दाखविल्या जात आहे. गावात एक आरोग्य सेवक, एक सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक असे तीन कर्मचारी नियुक्त आहेत. मात्र एकही कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. गावात आरोग्य केंद्र असून कोणतीच सेवा गरजूंना मिळत नसल्याने आरोग्य सेवेविषयी जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाकडून गलेलठ्ठ पगार घेऊन उदरनिर्वाह करणारे आरोग्य कर्मचारी मात्र गरजूंच्या जीवाशी खेळत आहे.