भाेगावती सरपंचपदी सोनू लोखंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:34 AM2021-03-20T04:34:11+5:302021-03-20T04:34:11+5:30

चिखली : सरपंचपदाच्या आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने तालुक्यातील भोगावती व दिवठाणा येथील सरपंचपद रिक्त राहिले होते. दरम्यान, ...

Sonu Lokhande as Bhaegavati Sarpanch | भाेगावती सरपंचपदी सोनू लोखंडे

भाेगावती सरपंचपदी सोनू लोखंडे

Next

चिखली : सरपंचपदाच्या आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने तालुक्यातील भोगावती व दिवठाणा येथील सरपंचपद रिक्त राहिले होते. दरम्यान, या गावासांठी नव्याने आरक्षण सोडत काढल्यानंतर १९ मार्च रोजी पार पडलेल्या निवडणुकीत भोगावती ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनू दिलीप लोखंडे विजयी झाल्या आहेत तर दिवठाणा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मीनाक्षी गजाननसिंह मोरे यांची अविरोध निवड झाली आहे.

तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीपश्चात गत फेब्रुवारीमध्ये सरपंच व उपसरपंच पदासाठी टप्प्याटप्प्याने निवडणूक घेण्यात आली आहे. यामध्ये भोगावती व दिवठाणा येथील सरपंचपद आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने रिक्त राहिले होते. दरम्यान, नव्या आरक्षणानुसार १९ मार्च रोजी निवडणूक प्रकिया पार पडली. यामध्ये भोगावती ग्रामपंचायतीवर माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित पॅनेलच्या सोनू दिलीप लोखंडे विजयी झाल्याने या ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. म. इसरार, रवी लोखंडे, रामदास लोखंडे, साहेबराव पाटील, गजानन डुकरे पाटील, खलील नवरंगी, अशोक रामदास डुकरे, शेख अब्राहार, शिवाजी साखरे, रवींद्र लोखंडे, राजू सपकाळ, शेख आसिफ शेख आरिफ, गणेश सपकाळ, बंटी लोखंडे, शेख इकबाल, दीपक लोखंडे, बबलू चौधरी, नितीन लोखंडे, प्रितम लोखंडे यांनी परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वानखेडे आणि ग्रामसेविका सरकटे यांनी काम पाहिले. तर दिवठाणा सरपंचपदी प्राचार्य मीनाक्षी गजाननसिंह मोरे यांची अविरोध निवड झाली आहे. प्राचार्या मीनाक्षी मोरे या स्व. शंकरबाबा मोरे यांच्या स्नुषा तर गावाचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गजाननसिंह मोरे यांच्या पत्नी आहेत. प्राचार्या मीनाक्षी मोरे उच्चविद्याविभूषित असून येत्या पाच वर्षांत दिवठाणा गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

Web Title: Sonu Lokhande as Bhaegavati Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.