बुलडाणा जिल्ह्यात ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या; दमदार पावसाची प्रतिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 05:08 PM2018-06-25T17:08:15+5:302018-06-25T17:12:03+5:30
आतापर्यंत जवळपास ७ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, शेतकºयांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : यंदाच्या पावसाळ््यातील सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस २३ जून रोजी बुलडाणा जिल्ह्यात पडल्यामुळे काही प्रमाणात नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे पेरणीसाठी शेतकºयांची लगबग सुरू झाली असून आतापर्यंत जवळपास ७ हजार हेक्टरवर पेरण्या झाल्या असून, शेतकºयांना दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. जून महिन्यात प्रारंभी देऊळगाव राजा, लोणार, मेहकर, सिंदखेड राजा या तालुक्यात या पावसाने हजेरी लावली होती. मात्र अन्य तालुक्यात अपेक्षीत असा हा पाऊस पडला नव्हता. त्यामुळे शेतकºयांसह प्रशासनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. अलिकडील वर्षातील पावसाच्या बेभरवशाचे प्रमाण पाहता शेतकरीही पेरणीसाठी फारसे धजावले नव्हते. त्यामुळे ज्या भागात थोड्यापार प्रमाणात पाऊस पडला होता. त्या भागात मोजक्याच शेतकºयांनी पेरणी केली होती. परिणामी २२ जून पर्यंत जिल्ह्यात अवघी एक टक्के क्षेत्रावर पेरणी झाली होती. मात्र २३ व २४ जून रोजी जिल्ह्यातील अनेक तालुक्यात काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे शेतकºयांनी पेरणीला सुरूवात केली आहे. त्यामुळे २५ जून पर्यंत पेरणीयोग्य सरासरी क्षेत्रापैकी १० टक्के म्हणजे ७ हजार ४८८ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. आता २५ जून रोजी जिल्ह्यात सरासरी ६३.७ मिमी पाऊस झाला. सोबतच घाटाखालील खामगाव, संग्रामपूर, नांदुरा, शेगाव तालुक्यातील पावसाची नोंद होईल या प्रमाणात प्रथमच हा पाऊस पडला. त्यामुळे या तालुक्यातही सध्या शेतकºयांची लगबग सुरू झाली. जिल्ह्यात यावर्षी ७ लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या नियोजन केले होते. त्यापैकी जवळपास ७ हजार ४८८ हजार हेक्टरवरच आतापर्यंत पेरणी झाली आहे. आता हा सार्वत्रिक स्वरुपाचा पाऊस झाल्याने शेतकरी पेरते झाले आहेत. --बॉक्स--- वार्षिक सरासरीच्या नऊ टक्के पाऊस जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या ९.५३ टक्के पाऊस झाला आहे. यात लोणार तालुक्यात १५ टक्के, सिंदखेड राजा, बुलडाणा तालुक्यात १४ टक्के आणि मेहकर, चिखली आणि देऊळगाव राजा तालुक्यातत १२ टक्के पाऊस झाला आहे. अन्य तालुक्यांची तुलना करता अवघा ९.५३ टक्क्यांच्या दरम्यान, हा पाऊस पडलेला आहे.
सोमवारी सरासरी ६३.७ मिमी पाऊस
रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ६३.७ मि.मी. पाऊस झाला होता. यात सर्वाधिक पाऊस लोणार तालुक्यात १०६ मि.मी., बुलडाणा ९६, चिखली ७५, देऊळगाव राजा ७८, सिंदखेड राजा ९५, मेहकर ९० मि.मी. पाऊस पडला आहे.