बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी
By admin | Published: July 20, 2014 11:39 PM2014-07-20T23:39:52+5:302014-07-20T23:39:52+5:30
आत्मा योजनेव्दारे सोयाबीन पिक प्रात्यक्षिक बिबीएफ यंत्राव्दारे पेरणी करण्यात आली.
रूईखेड मायंबा : कृषी विभाग उपक्रम अंतर्गत आत्मा योजनेव्दारे सोयाबीन पिक प्रात्यक्षिक बिबीएफ यंत्राव्दारे पेरणी करण्यात आली. बुलडाणा तालुक्यातील रूईखेड मायंबा यांच्या आदर्श शेतकरी गळीत धान्य बचत गटास सोयाबीन पिक प्रात्यक्षिक डीएस २२८ या जातीचे सरी वरंबा पध्दतीने पुर्ण केली.
यासाठी आर.बी.काळे, कृषी सहाय्यक ए.पी.अंभोरे, गजानन इंगळे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गजेंद्र जाधव यांच्यासह विष्णु पाटील, पोलिस पाटील समाधान उगले, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अनिल फेपाळे, बचत गटाचे विजय कालबिले यांच्यासह गटाचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते. याप्रसंगी कृषी अधिकारी यांनी शेतकर्यांसाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या खरीप पिकांच्या पिक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले.