अमडापूर परिसरात पेरणीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:24 AM2021-06-11T04:24:06+5:302021-06-11T04:24:06+5:30
शेतीचे सर्व कामे आटपून पूर्वमशागत करून शेतकरी पावसाची वाट बघत होता. हा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली ...
शेतीचे सर्व कामे आटपून पूर्वमशागत करून शेतकरी पावसाची वाट बघत होता. हा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. शेतकरी हे बी-बियाणे व खते खरेदी करण्यात व्यस्त आहे, तर काही शेतकरी बँकांमध्ये कर्जासाठी चकरा मारत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी शेतमालाची बेभाव विक्री केली. मात्र, आता बी घेण्यासाठी शेतकऱ्यांना दामदुप्पट रक्कम मोजावी लागत आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होत नाही. अनेक शेतकरी कृषी विभागाच्या बियाण्यावर अवलंबून आहेत. मात्र, कृषी विभाग लकी ड्रॉ पद्धतीने बियाण्याचे वाटप करीत असल्यामुळे मोजक्याच शेतकऱ्यांना बी मिळत आहे.
बांध फुटला..
या पावसामुळे शेतातील बांध, वळण फुटून वाहून गेली आहे. पुन्हा ९ जूनला झालेल्या पावसाने परिसरातील सर्व छोटी- छोटी जलाशय पाण्याने भरून खळखळ वाहू लागले आहेत. यंदा पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकरी मूग, उडीद या पिकांची पेरणी करणार आहे. पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली असून, जोरदार पडलेल्या पावसामुळे शेतात बांधलेली वळणे फुटल्याचे प्रकारही काही ठिकाणी समोर आले.