पेरणीच्या वादातून भावाचा खून

By Admin | Published: June 25, 2017 09:19 AM2017-06-25T09:19:51+5:302017-06-25T09:19:51+5:30

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल; चार आरोपी ताब्यात.

Sowing of blood from the dispute of sowing | पेरणीच्या वादातून भावाचा खून

पेरणीच्या वादातून भावाचा खून

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा: पेरणीचा वाद विकोपाला जाऊन सख्ख्या भावानेच भावाचा खून केल्याची थरारक घटना २४ जून रोजी तालुक्यातील मेहुणा शिवारात घडली. सदर प्रकरणात पाच आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.
तालुक्यातील टाकरखेड भागीले येथील डोंगरे कुटुंबाची शेती मेहुणाराजा शिवारात आहे. आज सकाळी कांतीलाल डोंगरे पत्नी व मुलासह शेतात तुरीचा पेरा करीत असताना त्यांचा लहान भाऊ गुलाब डोंगरे त्याची पत्नी मुलगा तेथे आले. यावेळी पेरणीचा वाद विकोपाला गेला व गुलाब डोंगरे, सुनील डोंगरे यांनी कांतीलाल डोंगरेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले सदर मारहाणीत कांतीलाल गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळला.
डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यास देऊळगावराजा ग्रामीण रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, मृतकाची पत्नी पार्वता कांतीलाल डोंगरे यांच्या फिर्यादीवरून गुलाब रामचंद्र डोंगरे, सुनील गुलाब डोंगरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला तर फिर्यादी व तिच्या मुलास लाठीकाठीने मारहाण केल्याप्रकरणी अमोल गुलाब डोंगरे, कमलबाई गुलाब डोंगरे व दुर्गाबाई रामचंद्र डोंगरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, ठाणेदार सारंग नवलकार, सहायक पोलीस निरीक्षक जे.बी. शेवाळे घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मुख्य आरोपी गुलाब डोंगरेसह चौघांना ताब्यात घेतले आहे.

Web Title: Sowing of blood from the dispute of sowing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.